Breaking News

‘शरद पवारांचे मतपरिवर्तन करण्यासाठी अनिल देशमुखांनी 2 कोटी रुपये मागितले’; सचिन वाझेंचा मोठा गौप्यस्फोट

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 7, 2021 6:57 pm
|

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह विरूद्ध अनिल देशमुख हे प्रकरण गाजत आहे. सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवत अनिल देशमुखांनी वाझेला मुंबईत 100 कोटीच्या वसुलीचे आदेश दिल्याचे खळबळजनक आरोप झाले. आता सचिन वाझेंनीही एक लेटरबॉम्ब टाकला आहे. वाझे यांनी या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील 3 मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. नियुक्तीसाठी अनिल देशमुखांनी 2 कोटी रुपये मागितल्याचा आरोप सचिन वाझे यांनी या पत्रात केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे पत्र सचिन वाझे यांनी लिहिलं आहे.

एनआयएच्या कोठडीत असलेल्या वाझे यांनी एनआयएला एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये वाझेंनी आपल्या नियुक्तीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध होता. ते आपल्याला हटवू इच्छित होते. त्यांचं मतपरिवर्तन करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, असा खळबळजनक दावा केला आहे.सेवेत आल्यानंतर मुंबईतील बार आणि पब आस्थापनांकडूही वसुली करण्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टार्गेट दिलं होतं, ऑक्टोबर 2020 मध्ये तत्कालीन गृहमंत्र्यांनी मला सह्याद्री गेस्ट हाऊसवर बोलावलं होतं आणि मुंबई शहरातील 1 हजार 650 बार, रेस्टॉरंट्समधून पैसा गोळा करण्यास सांगितलं होतं. मात्र, हे आपल्या क्षमतेच्या बाहेर असल्याचं सांगत आपण त्यास नकार दिला होता, असा खुलासा सचिन वाझेंनी पत्रातून केला आहे. तसेच सचिन वाझे यांनी आपल्या पत्रात अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, एनआयए स्पेशल कोर्टातून याबाबत सीबीआय (CBI) ने केलेला अर्ज मंजूर करत त्यांना सचिन वाझेच्या एनआयए कोठडीमधील चौकशीला परवानगी दिली आहे. दरम्यान आज सचिन वाझेच्या (Sachin Waze) एनआयए पोलिस कोठडीमध्ये 9 एप्रिल पर्यंत वाढ करण्यात आली आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 7, 2021, 6:57 pm
Tags:
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *