तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थानासाठी सज्ज, परवानगी असलेल्या पालख्यांनाच मिळणार पंढरपुरात प्रवेश !
पंढरपूर (सोलापूर) : मागील वर्षी प्रमाणे यंदाही पंढरपूरच्या आषाढी वारीवर (Pandharpur Ashadi Wari) कोविड-19 (Covid-19) चे सावट आहे. त्यामुळे कोरोनाच्या (Covid-19) पार्श्वभूमीवर शासनाने वारकरी सांप्रदायाची परंपरा कायम ठेवून पालखी सोहळ्याचे नियोजन केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आषाढी वारी प्रतिकात्मक स्वरूपात करण्यात येणार आहे. ज्या पालखी सोहळ्यांना शासनाने परवानगी दिली आहे ते पालखी सोहळे बसने पंढरपुरात दाखल होतील.
दरम्यान, आज देहू मधून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आणि औरंगाबाद मधील पैठण येथून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं प्रातिनिधिक स्वरुपात प्रस्थान होणार आहे. या सोहळ्यासाठी पूर्वी केवळ 100 भाविकांना परवानगी देण्यात आली होती. मात्र आता तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी 350 वारकऱ्यांना हजर राहण्याची मुभा देण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून काल (30 जून) हा आदेश जारी करण्यात आला. आज दुपारी 2 वाजता प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल. हा सोहळा प्रातिनिधिक स्वरुपात असणार असून त्यानंतर 19 जुलै रोजी पादुका एसटी बसने पंढरपूरकडे रवाना होतील. उद्या पैठण मधून संत एकनाथ महाराज यांची पालखी प्रस्थान करणार आहे. हा सोहळा दुपारी 12.30 वाजता सुरु होईल. हे प्रस्थान प्रातिनिधिक स्वरुपात असल्याने पालखी जुन्या वाड्यातून समाधी मंदिरापर्यंत जाईल. त्यानंतर पालखीचं 19 जुलै रोजी पंढरपूरच्या दिशेने एसटीने प्रस्थान करेल.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 1, 2021, 1:05 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY