Breaking News

सर्वच पास!: Maharashtra SSC Result 2021: दहावीचा निकाल ९९.९५ टक्केतर कोकण विभागाचा सर्वाधिक १०० % निकाल

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: July 16, 2021 12:57 pm
|

मुंबई: कोरोना संकटामुळे यंदा रद्द झालेल्या दहावी, बारावीच्या परीक्षांचा निकाल राज्य शिक्षण मंडळाने अंतर्गत मुल्यमापन पद्धतीने लावण्याचा निर्णय घेतला आहे. आज (16 जुलै) बोर्डाने एसएससी बोर्डाचा (Maharashtra SSC Board Result) निकाल लावला आहे. याला ऐतिहासिक म्हणता येईल, अशा स्वरुपाचा यंदाचा दहावीचा निकाल आहे. दहावीची परिक्षा होणार होती, त्यावेळी कोरोना व्हायरसची (corona virus) दुसरी लाट (second wave) प्रभावी झाल्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे यंदा दहावीच्या परिक्षेचा निकाल लावण्यात आला आहे.

कोरोना संकटामुळे यंदा रद्द झालेल्या दहावी, बारावीच्या परीक्षांचा निकाल राज्य शिक्षण मंडळाने अंतर्गत मुल्यमापन पद्धतीने लावण्याचा निर्णय घेतला आहे. आज (16 जुलै) बोर्डाने एसएससी बोर्डाचा (Maharashtra SSC Board Result) निकाल लावला आहे.

दहावी बोर्डाचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजताची वेळ देण्यात आली तरीही बोर्डाने उत्तीर्ण झालेल्यांची विभागनिहाय सरासरी निकालांची आकडेवारी जारी केली. उल्लेखनीय बाब म्हणजे, यात सर्वाधिक 100% निकाल कोकण विभागाचा आला आहे. तर सर्वात कमी असला तरीही नागपूर विभागातील 99.84% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.बोर्डाने जारी केलेल्या सरासरी आकडेवारीनुसार, या वर्षी सुद्धा विद्यार्थिनींनी 0.02 टक्क्याने बाजी मारली आहे. विद्यार्थ्यांचा निकाल सरासरी 99.94% लागला आहे. तर विद्यार्थिनींचा निकाल 99.96% आला आहे. अर्थातच 99.96 टक्के विद्यार्थिनी यावेळी उत्तीर्ण झाल्या आहेत. 27 विषयांचा निकाल 100% आला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी 97.84% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

येथून दुपारी 1 वाजता पाहता येईल निकाल

अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

दहावी निकालाच्या लिंक वर क्लिक करा.

तुमचा रोल नंबर आणि आईच्या नावाची 3 अक्षरं एंटर करा.

सबमीट करा. तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http: /result.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. या माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल. मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ http: /result.mh-ssc.ac.in असे आहे. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल. 2021 च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत श्रेणी सुधार योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधींमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील एक/दोन संधी उपलब्ध राहतील, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: July 16, 2021, 12:57 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *