Breaking News

पालघर जिल्ह्यातील सर्व नौका समुद्रकिनारी दाखल

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 16, 2021 3:43 pm
|

पालघर :अरबी समुद्रातून उठललेल्या तौकक्ते चक्रवादळामुळे बहुतांश राज्यांनी अलर्ट जाहीर केला आहे. प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांचेकडून प्राप्त माहितीनुसार अरबी समुद्रात निर्माण होणा-या चक्रीवादळामुळे ठाणे शहर / जिल्ह्यात दिनांक १६ व १७ मे २०२१ रोजी या कालावधीत ठाणे शहरात तसेच जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तरी त्या अनुषंगाने नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी. असे सांगण्यात आले आहे. या वादळाच्या प्रभावाने महाराष्ट्र व गोवा किनार पट्टीवर ५० ते ६० ते ७० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
दरम्यान , जिल्ह्यातील. मच्छिमारीसाठी समुद्रात गेलेल्या 512 नौका समुद्रकिनारी सुखरूप पोहचल्या आहेत. चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने मच्छीमारांसाठी तसेच समुद्रकिनारी रहिवासी असलेल्या नागरीकांसाठी अलर्ट जारी केला होता. मच्छीमार आणि नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून . पालघर जिल्ह्यातील सर्व नौका समुद्रकिनारी परत आल्या आहेत

तोक्ते चक्रीवादळादरम्यान समुद्रकिनाऱ्यावर कोणताही जलचर प्राणी (मासे, कासव इ.) वाहून आल्याचे दिसून आल्यास तसेच बोटींचे व मासेमारी जाळ्यांचे नुकसान झाल्यास मत्स्यव्यवसाय विभागाच्या संबंधित परवाना अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन मत्स्य व्यवसाय विभागाने केले आहे. यासाठी सागरी किनाऱ्यावरील प्रत्येक जिल्ह्यातील विभागाच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकही विभागाने जाहीर केले आहेत.

मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे-

मुंबई शहर

वरळी / ससून गोदी : कु. पाटील (७९७२२६३९४) नवीन भाऊचा धक्का: श्री. बादावार (९४२२८७२८५६)

ठाणे / पालघर

ठाणे: श्री. पाटील (९९२३०५०९८३)
डहाणू : कु. भोय(८६००६२७९०८)
सातपाटी: श्री. बाविस्कर (८४४६३२५०४०)
वसई : श्री. कोरे (९८२३०४११८९)
एडवण: श्री. अलगिरी (९८२३२१२७२२)

रत्नागिरी

जयगड : सौ.कांबळे (८३६९०८५०४९)
मिरकरवाडा : श्री. पाथरे (९५९४७४८७३८) साखारीनाटे : श्री. महाडवाला (९४०५९१०५०३)
गुहाघर: श्री. देसाई (९४०५०८५६१५)
दाभोळ : सौ.साळवी (८२७५४३५७०३)

मुंबई उपनगर

माहुल तुर्भे : श्री. साबळे (८२०८९०६९०२)
वर्सोवा : श्री. बुंदेले (९८३३९११९०५)
मढ गोराई : श्री. जावळे (९८३३२६६२५१)

रायगड

उरण : श्री. दाभणे(७०२१५४२११२)
अलिबाग: श्री. अंबुलकर (८०८०९९२२०३)
मुरुड : श्री. वाळुंज (७७९८७१६७२७)
श्रीवर्धन : श्री. पाटील (९८८१४५२४३६)

सिंधुदुर्ग

देवगड : श्री.मालवणकर (९४२२२१६२२०)
वेंगुर्ला : श्री. जोशी (९४२१२३८९१३)
मालवण : श्री. भालेकर (९८२३५७९३८२)

याशिवाय मत्स्यव्यवसाय विभागाने मच्छिमारांसाठी सूचनाही केल्या आहेत. मच्छीमार बांधवांनी आपल्या मासेमारी नौका आणि इतर साधने सुरक्षित ठेवावीत. नौका मालकांनी खलाशांची सुरक्षित ठिकाणी सोय करावी. जिवितहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यक साधनसामुग्री सोबत बाळगावी, असे आवाहनही विभागाने केले आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 16, 2021, 3:43 pm
Tags:
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *