Breaking News

मुंबईतील दगडी चाळ होणार इतिहासजमा, उभा राहणार 40 मजली टॉवर

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 20, 2021 6:55 pm
|

मुबईतील ओळखली जाणारी दगडी चाळ (Dagdi Chawl) आता लवकरच इतिहासजमा होणार आहे. दगडी चाळ ही मुंबईचा कुख्यात गुंड अरुण गवळी (ArunGawli) याची ओळख म्हणून पाहिली जाते. अरुण गवळीचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या दगडी चाळीचा पुनर्विकास केला जाणार असिन आता आता 40 मजल्यांचे टॉवर त्या ठिकाणी उभारले जाणार असल्याची माहिती म्हाडाचे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्विकास मंडळ (MBRRB)अध्यक्ष विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांनी ही माहिती दिली आहे. यात दगडी चाळीतील 10 इमारतींचा समावेश आहे.

अरुण गवळीने पुनर्विकासासाठी म्हाडाकडे प्रस्ताव पाठवला होता. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर म्हाडाकडून प्रस्ताव मंजूर करण्यात आला. दगडी चाळीत एकूण 338 भाडेकरु असून अरुण गवळी संपत्तीचा मालक आहे.

10 इमारतींमध्ये प्रत्येकी चार मजले असून यामधील दोन इमारती धोकादायक असल्याने आधीच पाडण्यात आल्या आहेत. यामुळे प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत त्या मोकळ्या जागेत भाडेकरुंसाठी तात्पुरती राहण्याची सोय केली जाईल.” असं घोसाळकर यांनी सांगितलं आहे.

“पुनर्विकासासाठी लवकरच बिल्डरला ना हरकत प्रमाणपत्र दिलं जाईल. दरम्यान भाडेकरुंसाठी इरादा पत्र मंजूर झालं आहे. त्याआधी एमबीआरआरबी पात्र भाडेकरुंची यादी तयार करणार आहे,” असंही घोसाळकर यांनी म्हटले आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 20, 2021, 6:55 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *