Mumbai | 1 जूनपर्यत मुंबईतील तीन कोविड सेंटर बंद राहणार, नविन रूग्णांना प्रवेश नाही
कोरोना व्हायरसच्या परिस्थितीतच उद्भवलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे भारतातील विविध ठिकाणी त्याचा जबरदस्त फटका बसल्याचे दिसून आले. महाराष्ट्र, दमण आणि दीव, गुजरातच्या किनारपट्टी भागात त्याचा मोठा प्रभाव दिसून आला. मुंबई, दहीसर त्याचसोबत शहरातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे पडली.
त्याचाच फटका मुंबईत महानगरपालिके तर्फे चालू करण्यात आलेल्या जंबो कोविड सेंटरला देखील बसला असल्याने मुंबईतील बीकेसी, मुलुंड आणि दहिसर येथील कोविड सेंटर हे 1 जून पर्यंत दुरूस्तीच्या कारणास्तव बंद ठेवण्यात येणार आहे. या कोविड सेंटरचे झालेले नुकसानाची दुरूस्ती करण्यासाठी तसेच येणाऱ्या काळात पावसाचादेखील कोणताही परिणाम या सेंटरवर होऊ नये यासाठी 10 दिवस हे सेंटर बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत नविन रूग्णांना या कोविड सेंटरमध्ये प्रवेश दिला जाणार नाही अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मुंबईत उद्यापासून लसीकरण पुर्ववत होणार आहे. लसीकरणावर याचा कुठलाही परिणाम होणार नसल्याचे देखील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या सगळ्यादरम्यान, आता पाच दिवसानंतर आणखी एक चक्रीवादळ येणार असल्याची बातमी आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार 23-24 मे दरम्यान चक्रीवादळ ‘यास’ (Cyclone Yaas) बंगालच्या उपसागराला भिडेल. यावेळी ओमानने या चक्रीवादळाला हे नाव दिले आहे. हवामानतज्ज्ञ ‘यास’ वादळाला अत्यंत धोकादायक मानत आहेत. या चक्रीवादळाचा परिणाम अंदमान आणि निकोबार बेटे, ओडिशा आणि पश्चिम बंगालवर होईल.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 24, 2021, 1:21 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY