Breaking News

तालिबानी अवघ्या आठवडाभरातच अफगाणिस्तानवर मिळवला ताबा तसंच राजधानी काबूलवरही कब्जा,विमानतळावर एकच गर्दी

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: August 16, 2021 1:24 pm
|

काबूल: तालिबानने राजधानी काबूलवरही कब्जा केला आहे. रविवारी तीन अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडल्या.अफगाणिस्तानच्या (Afganistan) हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Hamid Karzai Airport) अत्यंत भयावह स्थिती आहे. तालिबानच्या (Taliban) हाती सत्ता आल्यामुळे देशाबाहेर जाण्यासाठी अफगाणि नागरिकांनी काबूल विमानतळावर (kabul airport) एकच गर्दी केली आहे. विमान पकडण्यासाठी, विमानात प्रवेश मिळवण्यासाठी अक्षरक्ष: चेंगराचेंगरी सुरु आहे. विमातळावर प्रचंड गोंधळ आणि तणावाची स्थिती आहे. हाच गोंधळ रोखण्यासाठी अमेरिकन सैनिकांना हवेत गोळीबार करावा लागला.अफगाणिस्तानची हवाई हद्द बंद झाल्यामुळे विमानांचे संचालन करता येणार नाही, असे एअर इंडियान एएनआयला सांगितले. काबुलमधून आणखी नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने एअर इंडियाला दोन विमाने सज्ज ठेवण्यास सांगितले होते. सूत्रांनी ही माहिती दिली. काबुल ते नवी दिल्ली इमर्जन्सी ऑपरेशन्ससाठी एअर इंडियाने आपल्या क्रू सदस्यांना तयार केले होते.

https://twitter.com/bsarwary/status/1427002551858311173

पहिली घटना- राष्ट्रपती अशरफ गनी आणि उपराष्ट्रपती अमिरुल्लाह सालेह यांनी त्यांच्या काही जवळच्या मित्रांसह देश सोडला.

दुसरी घटना- तालिबानने राष्ट्रपती भवन (आर्ग) काबीज केले. रात्री उशिरा काही व्हिडिओ देखील समोर आले. यामध्ये तालिबान काबूलच्या रस्त्यावर फिरताना दिसतात.

तिसरी घटना- तालिबानी नेते मुल्ला बरदार यांचे मोठे विधान बाहेर आले. ते म्हणाले – सर्व लोकांचे जीवन आणि मालमत्ता संरक्षित केली जाईल. येत्या काही दिवसात सर्व काही नियंत्रणात येईल. आम्ही कधीच विचार केला नव्हता की जिंकणे इतके सोपे आणि इतके जलद होईल. येत्या काही दिवसात सर्व काही पूर्वपदावर येईल.

अमेरिकेकडून सुरक्षा अलर्ट जारी

काबूलमधील झपाट्याने बदलणाऱ्या परिस्थितीदरम्यान अमेरिकेने सुरक्षा अलर्ट जारी केला आहे. त्यात म्हटले – विमानतळासह काबूलमधील सुरक्षा परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. काही अहवालांनुसार, विमानतळाला आग लागली आहे. अहवालांनुसार, काबूलमधील अमेरिकन दूतावास आता रिकामे झाले आहे. अमेरिकेचे राजदूतही अफगाणिस्तानातून निघून गेले आहेत.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: August 16, 2021, 1:24 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *