Breaking News

रोहित पवार यांच्या पुढाकारातून कर्जत व जामखेड होणार नगर जिल्ह्यातील ‘ऑक्सीजन हब.’

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 14, 2021 6:31 pm
|

कर्जत/जामखेड: कोरोनाच्या दुस-या लाटेत राज्यासह देशात ऑक्सीजन तुटवड्यामुळे सर्वच यंत्रणांना तारेवरची कसरत करावी लागत होती. या अडचणीच्या काळात दोन्ही तालुक्यात ऑक्सीजनचा तुटवडा होणार नाही याची सर्वतोपरी काळजी आ. रोहित पवार यांनी घेतली आहे. दरम्यान दुदैवाने तिसरी लाट आल्यास ऑक्सीजनची कमतरता भासू नये यासाठी पूर्वनियोजन करून आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून कर्जत जामखेड तालुक्यात ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत. या प्रकल्पांना जिल्हा प्रशासनामार्फत मंजुरी मिळाली असून कर्जत व जामखेड तालुके ऑक्सीजन निर्मितीत आता स्वयंपूर्ण होणार आहेत व नगर जिल्ह्यातील ऑक्सीजन हब म्हणून आता हे दोन्ही तालुके नावारूपास येणार आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून वाढते संक्रमण रोखण्यासाठी विविध प्रभावी व नाविन्यपूर्ण उपाययोजना कर्जत जामखेडचे आ. रोहित पवार राबवत आहेत. भविष्यातील दृष्टीकोनातून कर्जत जामखेडमध्ये उपचार घेणा-या रुग्णांना मुबलक प्रमाणात ऑक्सीजनचा पुरवठा व्हावा याकरिता कर्जत व जामखेडमध्ये हे ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत. याद्वारे कर्जतमध्ये १२०० एलपीएम व जामखेडमध्ये ६५० एलपीएम ऑक्सीजन निर्मिती होणार असून या प्रकल्पातून कर्जत येथे २५० तर जामखेड येथे १२५ ऑक्सीजन सिलेंडर प्रति दिवशी भरले जाणार आहेत. हवेतून ऑक्सीजन संकलित करून त्याद्वारे द्रवरुप ऑक्सीजनची निर्मिती या प्रकल्पात होणार आहे. कर्जत व जामखेडमध्ये उपचारासाठी येणा-या रुग्णांचा आवाका लक्षात घेऊन आ. रोहित पवार यांनी सद्यपरिस्थितीत ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी पाठपुरावा केल्याने सर्वच रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे. त्यामुळे कर्जत व जामखेडकरांची त्यांनी मने जिंकलेली आहेत. तसेच, कर्जत जामखेडसह आजूबाजूच्या करमाळा, परांडा, भूम, दौंड, बीड, कडा व आष्टी या भागातून देखील अनेक कोरोनाबाधित रुग्ण हे उपचारासाठी कर्जत व जामखेड येथे आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या सुसज्ज जम्बो कोव्हीड सेंटरला प्राधान्य देतात.

दरम्यान, “कोरोनाच्या या दुस-या लाटेत ऑक्सीजनच्या कमरतेमुळे सर्वच वैद्यकीय यंत्रणांना ऑक्सीजन मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. येत्या काळात कर्जत व जामखेड तालुक्यासाठी मुबलक प्रमाणात ऑक्सीजनचा पुरवठा व्हावा या नियोजनातून कर्जत जामखेडमध्ये ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यासाठी आ. रोहित पवार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ, अहमदनर जिल्हा प्रशासन व महाविकास आघाडीचे आभार मानले आहेत.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 14, 2021, 6:31 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *