देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या तीन लाखांच्या उंबरठ्यावर,तर राज्यात ऑक्सिजनची मागणी सातपट वाढली
नवी दिल्ली : देशभरात 13 कोटी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत. देशभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. कोरोनाबाधितांचा आकडा दररोज नवनवे उच्चांक गाठत आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 295,041 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 2023 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
तर दुसरीकडे महाराष्ट्रात देखील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस विक्रमी वाढ होत आहे. सर्वाधिक काेराेनाग्रस्त राज्यांत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. मंगळवारी राज्यात ६२ हजार ९७ नवे रुग्ण सापडले. दिवसभरात ५१९ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण रुग्णसंख्या आता ३९ लाख ६०,३५९ वर पाेहाेचल आहे. त्यामुळे राज्यात ऑक्सिजनची मागणी सातपट वाढली आहे. राज्याची ऑक्सिजन उत्पादन क्षमता 1287 टन आहे. पुण्याची मागणी वाढल्याने मराठवाड्यातील पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. पुण्यातून नगर, लातूर, बीड, अकोला, जालना, यवतमाळ याठिकाणी पुरवठा केला जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ऑक्सिजनची मागणी सात पटीने वाढली आहे. . दिवसभरात साधारणत: 59 हजार नवे रुग्ण आढळत आहेत. अनेकांना श्वसनाचा त्रास जाणवत असल्यामुळे ऑक्सिजनच्या मागणीत कमालीची वाढ झालीय. दिलासादायक बाब म्हणजे काल 54 हजार 224 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.
दरम्यान ,राज्यात ऑक्सिजनची मागणी सातपट वाढली आहे. राज्याची ऑक्सिजन उत्पादन क्षमता 1287 टन आहे. पुण्याची मागणी वाढल्याने मराठवाड्यातील पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. पुण्यातून नगर, लातूर, बीड, अकोला, जालना, यवतमाळ याठिकाणी पुरवठा केला जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ऑक्सिजनची मागणी सात पटीने वाढलीय. राज्यातील 80 टक्के ऑक्सिजन उद्योगांसाठी वापरला जातो. यात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुर या जिल्ह्यांची ऑक्सिजन निर्मितीची क्षमता 417 टन आहे. मात्र वैद्यकीय मागणी पाचशे टनांच्या पुढे गेली आहे. तर पुण्यातील ऑक्सिजनची मागणी वाढत आहे. त्यामुळे पुण्यातून मराठवाड्यात होणार ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत होऊ शकतो.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 21, 2021, 12:03 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY