प्रसार माध्यमं काय भलतच दाखवत आहेत: निलेश राणे
देवेंद्रजींची इच्छा नसतानाही त्यांना भेटले
सिंधुदुर्ग : तौक्ते वादळात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काही दिवसांपुर्वी कोकण दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा दौरा केला. या दौऱ्यात देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची गुप्त भेट झाल्याचा खळबळजनक खुलासा भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी केला आहे. निलेश राणेंनी म्हटले ,देवेंद्र फडणवीसजी जेव्हा वादळाची पाहणी करायला कोकणात आले, रत्नागिरी गेस्टहाऊसवर उदय सामंत व त्यांचे बंधू त्यांना भेटायला तडफडत होते. दोघेही कसेतरी साहेबांच्या रूम पर्यंत पोचले व देवेंद्रजींची इच्छा नसतानाही त्यांना भेटले. प्रसार माध्यमं काय भलतच दाखवत आहेत, कृपया दुरुस्ती करावी, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीसजी जेव्हा वादळाची पाहणी करायला कोकणात आले, रत्नागिरी गेस्टहाऊसवर उदय सामंत व त्यांचे बंधू त्यांना भेटायला तडफडत होते. दोघेही कसेतरी साहेबांच्या रूम पर्यंत पोचले व देवेंद्रजींची इच्छा नसतानाही त्यांना भेटले. प्रसार माध्यमं काय भलतच दाखवत आहेत, कृपया दुरुस्ती करावी.
— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) May 25, 2021
दरम्यान , निलेश राणे यांनी केल्याल्या या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कोकण दौऱ्यात दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाल्याचं कळतं. उदय सामंत हे देवेंद्र फडणवीस रत्नागिरी दौऱ्याच्या आधीच शासकीय विश्रामगृहात पोहोचले होते. इतरांच्या भेटीगाठी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचं वृत्त आहे. या दौऱ्यात राजकीय घडामोडी झाल्याचं आता समोर आलं आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 25, 2021, 1:09 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY