राजीव सातव यांना संसर्ग झालेला सायटोमॅजिलो विषाणू नेमका आहे तरी काय? जाणून घ्या लक्षणे
काँग्रेस खासदार ॲड. राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन झाले. यामुळे महाराष्ट्रासह दिल्लीतील राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे . त्यांच्या निधनाची बातमीने त्यांच्या कुटूंबासह त्यांच्या समर्थकांवर दु:खाचा डोंगर कोसळला. आज पहाटे 5 वाजता त्यांचे निधन झाले. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये मागील 23 दिवसांपासून उपचार सुरु होते. आज अखेर राजीव सातवांचा कोरोना व इतर आजारांसोबत केलेल्या संघर्षाचा शेवट झाला. कोरोनावर मात करत असतानाच सातव यांना सायटोमॅजिलो विषाणूचा (Cytomegalovirus) संसर्ग झाला होता. नावाप्रमाणेच हा विषाणू खूप वेगळा असून त्याची लक्षणेही वेगळी आहे.सायटोमॅजिलोची लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. हे सर्वसाधारण दुखणं आहे असे समजून अंगावर न काढता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. या आजाराकडे दुर्लक्ष करू नका.
सायटोमॅजिलो विषाणू म्हणजे काय?
सायटोमॅजिलो हा विषाणू सर्वसाधारण विषाणू आहे. अमेरिकेमध्ये 40 वर्ष पूर्ण झालेल्या जवळपास निम्याहून अधिक व्यक्तींच्या शरिरात हा विषाणू आढळून येतो. हा विषाणू संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना लाळ किंवा थुंकीद्वारे प्रसरतो. या विषाणू संसर्गामुळे चेहऱ्यावर किंवा तोंडाच्या आतल्या भागात, ओठावर फोड येतात. सायटोमजिलो झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी रक्त चाचणी आणि इतर मार्गांचा वापर केला जातो.
रोग प्रतिकार शक्ती कमजोर असणाऱ्यांसाठी धोका
ज्या व्यक्तींची रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे ते या विषाणू संसर्गावर मात करु शकतात रोग प्रतिकारशक्ती चांगली असणाऱ्यांवर या विषाणूचा प्रभाव जाणवत नाही. मात्र, ज्या व्यक्तींची रोग प्रतिकार शक्ती कमजोर असते त्यांच्याशी हा विषाणू धोकादायक ठरु शकतो.
सायटोमॅजिलोची लक्षणं कोणती?
सायटोमॅजिलोचा संसर्ग झाल्यानंतर त्याची प्राथमिक लक्षणंही दिसून येतात. बाधित व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल जाणवतात. डोकेदुखे, श्वास घेताना अडचण येते, ताप येणे ही सायटोमॅजिलोची लक्षणं आहेत. सायटोमॅजिलोचा संसर्गचं निदान करण्यासाठी रक्ताची चाचणी केली जाते. सायटॉमॅजिलो हा विषाणू लहान मुलांमध्ये देखील आढळतो. याशिवाय गरोदर महिलांमध्येही हा विषाणू आढळून येतो.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 16, 2021, 3:25 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY