Weekend Lockdown : शनिवार-रविवारसाठी मार्गदर्शन सूचना जारी; वाचा- काय सुरु, काय बंद?
मुंबई : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आज सायंकाळपासून (09 एप्रिल) वीकेंड लॉकडाऊन (Maharashtra Weekend Lockdown) जाहीर करण्यात आला आहे. राज्यात रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू करण्यात आली आहे. यादरम्यान कोणते निर्बंध लागू असणार? सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु राहणार का? खासगी वाहतूक व्यवस्थेविषयी नियम काय? याची गाईडलाईन्स राज्य सरकारकडून जारी करण्यात आल्या आहेत. (Maharashtra Government declared new weekend lockdown rules guidelines)
वीकेंड लॉकडाऊनमध्ये काय सुरु राहणार?
कोणतही ठिकाण जे अत्यावश्यक वस्तू विकत असेल ते 4 आणि 5 एप्रिलला सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत कोरोनाच्या कडक निर्बंधांसह सुरु राहणार आहे. जर ते विविध वस्तू ज्या अत्यावश्यक वस्तूंमध्ये येत नाहीत त्या विकत असतील तर ते बंद राहतील.
अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. कोणीही व्यक्ती महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू शकणार नाही.
कोरोना नियमांचं पालन करत मार्केट सुरु राहणार, स्थानिक प्रशासनाला वाटलं की नियमांचं उल्लंघन होत आहे.तर, ते राज्य सरकारकडून परवानगी घेवून मार्केट बंद करु शकतात.
बांधकामासाठी वस्तू पुरवणारी दुकाने सुरु असणार नाही.
दारुची दुकानं खुली असणार नाही
ढाबे सुरु असतील मात्र, तिथे देखील टेक अवे होम आणि होम डिलीव्हरी पर्याय उपलब्ध असेल.
एसी. कुलर, फ्रीज दुरुस्ती दुकानं सुरु नसतील. लॅपटॉप, मोबाईल, कॉम्प्युटरची दुकानं बंद असतील.
सेतू कार्यालय, नागरीक सेवा केंद्र सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु असतील. रेस्टॉरंट आणि बार स्थानिक प्रशासनान लावलेल्या नियमांसह सकाळी 7 ते सायंकाळी 8 पर्यंत फक्त पार्सल सुविधेसह सुरु असतील.
गॅरेज सुरु राहतील, स्थानिक प्रशासनानं तिथे कोरोना नियमांचं पालन केलं जातेय का ते पाहावे. ऑटो पार्ट पुरवणारी दुकानं बंद राहतील.
केंद सरकारच्या सार्वजनिक सेवा क्षेत्रातील कंपन्यांचे कर्मचारी अत्यावश्यक सेवा पुरवठादार म्हणून समजले जाणार नाहीत. मात्र, ज्या सेवा अत्यावश्यक सेवेत गणल्या जातात त्यांना यातून सूट असेल.
4 एप्रिलच्या शासन निर्णयानुसार नागरीक दारु होम डिलिव्हरी पद्धतीनं खरेदी करु शकतात. मात्र, निश्चित करण्यात आलेल्या वेळेतचं दुकानांकडून सेवा दिली जाईल. उत्पादन शुल्क विभागाचे नियम पाळावे लागतीतल.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 9, 2021, 8:14 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY