Cyclone Tauktae: मुंबईत सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस; मरीन ड्राईव्हवर खवळलेल्या समुद्राचं रौद्र रुप; पाहा
मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जोरदार वाऱ्यासह मुंबई, उत्तर कोकण, ठाणे आणि पालघरमधील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्याप्रमाणे Tauktae चक्रीवादळ गोव्याकडून रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड असा प्रवास करत आता मुंबईत पोहोचले आहे. हे वादळ सायंकाळपर्यंत गुजरातमध्ये पोहोचणार आहे. हे वादळ भयानक रुप धारण करण्याची शक्यता लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. या चक्रीवादळामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद ठेवण्यात आला आहे. तसेचमुंबईतील मोनोची सेवाही बंद ठेवण्यात आली आहे.मुंबईत सोमवारी पहाटेपासून तौक्ते चक्रीवादळाचा मोठा जोर पाहायला मिळत आहे. त्यामुळे शहरात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत. नुकताच एएनआय वृत्त संस्थेने मरिन ड्राईव्ह येथील समुद्राचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तौक्ते चक्रीवादळामुळे खवळलेल्या अरबी समुद्रात उंच लाटा निर्माण झाल्याचे दृश्य दिसत आहे.
दरम्यान ,मच्छिमारांना समुद्राच्या किनाऱ्यावर न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यानंतर महाराष्ट्रातील सर्व 4526 नौका आणि गुजरातच्या 2258 नौका सुरक्षितपणे बंदरांवर पोहोचल्या आहेत. आज मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
#WATCH | Maharashtra: Arabian Sea turns rough, in wake of #CycloneTaukte. Visuals from Marine Drive in Mumbai. pic.twitter.com/ovbFFJPruQ
— ANI (@ANI) May 17, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 17, 2021, 5:56 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY