विरार: आरटीपीसीआर टेस्ट करताना स्टिक नाकात तुटली; डॉक्टरला बेदम मारहाण
मुंबई– देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा थैमान घातले आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या चिंता वाढवणारी गोष्ट आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने हॉस्पिटल्स बेड, ऑक्सिजन सिलिंडर कमी पडत असल्याची परिस्थिती आहे. दुसरीकडे आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. अशात डॉक्टरांवर हल्ले होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. असाच एक प्रकार विरार पूर्वमध्ये समोर आला आहे. आरटीपीसीआर टेस्ट करताना स्टिक नाकात तुटल्याने नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केली. बालाजी हॉस्पिटलमधील हा प्रकार असून या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
विरार: आरटीपीसीआर टेस्ट करताना स्टिक नाकात तुटली; डॉक्टरला बेदम मारहाण#virar #attackondoctor pic.twitter.com/Z7tpKBHtmy
— Kaaltarang News Marathi (@kaaltarangnews) May 23, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, विरार पूर्वेतील बालाजी रुग्णालयात एक महिला आपली कोविड आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी गेली होती. महिलेची चाचणी करत असताना तिच्या नाकात स्टिक लुटली. यानंतर डॉक्टर पळून जात असल्याचे समजून रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना बेदम मारहाण केली. त्यानंतर डाक्टरांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक केली नसल्याचे समोर आले आहे. संबंधित व्हिडिओ नातेवाईकांकडूनच शूट करण्यात आल्याचं समजतंय.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 23, 2021, 6:08 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY