विरारची दुर्घटना काही नॅशनल न्यूज नाहीः आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे धक्कादायक विधान
मुंबई : विरारची जी घटना घडली आहे, ती काही नॅशनल न्यूज नसल्याचे धक्कादायक विधान राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. विरार पश्चिम भागात विजय वल्लभ कोव्हिड केअर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागल्याने आज पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला. या आगीत होरपळून 13 जणांचा मृत्यू झाला, तर अनेकांची प्रकृती गंभीर आहे.विरारच्या दुर्घटनेनंतर पत्रकारांनी प्रश्न विचारला असतात, ही जी काही घटना घडली आहे. ती काही नॅशनल न्यूज नाही आहे, राज्य सरकार म्हणून आम्ही जी काही मदत द्यायची ती देणार आहोत. राज्य सरकार ५ लाख आणि महा पालिका ५ लाख असे देणार आहोत. नाशिकची घटना घडली तशी मदत मृतांच्या नातेवाईकांना करणार आहोत. फायर ऑडीट, स्ट्रक्चरल ऑडीट, इलेक्ट्रीक ऑडीट करणार आहोत.
पालघर जिल्ह्यातील विरार पश्चिममध्ये असलेल्या विजय वल्लभ कोविड सेंटरमध्ये आयसीयू कक्षाला आग लागली. या आगीचे एसीमध्ये झालेला शॉर्ट सर्किट असल्याचे सांगण्यात येत आहे. आगीची घटना शुक्रवारी पहाटे 3.25 वाजता घडली. रुग्णांच्या नातेवाइकांनी आरोप केलाय की, आग लागली त्यावेळी कर्मचाऱ्यांना रुग्णांन आत सोडून तेथून पळ काढला. या दुर्घटनेला हेळसांड, कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. एवढी मोठी घटना होऊनही राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मात्र अतिशय असंवेदनशील वक्तव्य केले आहे. ही नॅशनल न्यूज नाही, म्हणजे फार काही मोठी घटना नाही, असे राजेश टोपे यांना सूचवायचे आहे काय? तेरा जणांचा मृत्यू होतो, या मृत्यूंचे काहीच मोल नाही का? असे सवाल आता विचारले जात आहेत.
दरम्यान, २६/११ चा हल्ला झाला त्यावेळी तत्कालिन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी बडे बडे देशोंमे ऐसी घटना होती है…. असे म्हटले होते. त्यानंतर त्याचे गृहमंत्रीपद गेले होते. राजेश टोपे यांनी गेल्या वर्षभरात खूप चांगले काम केले आहे. परंतु या एका वाक्यामुळे ते अडचणीत आले आहेत.
पाहा काय म्हणाले राजेश टोपे
https://twitter.com/kaaltarangnews/status/1385516376115142659
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 23, 2021, 2:21 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY