करोना रुग्णाला ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड मिळेना तर इथे पहा माहिती
मुंबई: भारतामध्ये कोरोना वायरसच्या दुसरी लाटेने अक्षरशः धुमाकूळ घातल्याने सर्वजण चिंताग्रस्त आहे. यामध्ये महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोनाचे अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सारीच यंत्रणा अॅक्शन मोड मध्ये काम करत आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये तरूणांमध्ये कोरोना फोफावत आहे आणि तो जीवघेणा ठरत असल्याचं चित्र आहे. या दरम्यान, केंद्र सरकारने कोरोनाच्या तिसर्या लाटेबाबत इशारा दिला आहे. सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन म्हणाले की, कोरोनाची तिसरी लाटही येईल. विषाणूचा संसर्ग त्याच्या उच्च स्तरावर आहे. तिसरी लाट कधी येईल आणि किती धोकादायक आहे, हे अद्याप माहिती नाही, परंतु नव्या लाटेसाठी आपण तयार असले पाहिजे. राघवन बुधवारी कोरोनाच्या स्थितीबद्दल पत्रकार परिषदेत बोलत होते.
यातच ,ऑक्सिजन बेड , ICU, व्हेंटिलेटर बेड ,कोविड केअर सेंटर कुठे आणि कसं शोधायचं? ही चिंता तुम्हांला सतावत असेल तर खालील काही वेबसाईट, बेड ट्रॅकिंग लिंक्स, हेल्पलाईन नंबर्स नक्की जवळ ठेवा म्हणजे तुमची बेड शोधण्यासाठी धावपळ कमी होण्यास मदत होऊ शकते.
दरम्यान , कालतरंग न्युज मराठी कडून मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, बीड मधील कोविड 19 संकटामध्ये आपत्कालीन वेळी नेमका ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड शोधण्यासाठी, त्याची स्थिती कुठे पहायची याची माहिती देणार्या लिंक उपलब्ध करून दिली आहे.
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधील बेड्स ची स्थिती इथे पहा
पुणे– https://www.divcommpunecovid.com/ccsbeddashboard/hsr
नाशिक– https://covidnashik.com
नागपूर– http://nsscdcl.org/covidbeds/AvailableHospitals.jsp
मुंबई– https://stopcoronavirus.mcgm.gov.in/key-updates-trends
ठाणे– https://covidthane.org/availabiltyOfHospitalBeds.html
सध्या राज्यात 15 मे पर्यंत ब्रेक द चेन अंतर्गत कडक नियमावली लागू आहे. कलम 144 लागू असल्याने नागरिकांना घराबाहेर अनावश्यक कारणांसाठी बाहेर पडण्यावर बंदी आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा आणि त्यामधील कर्मचारी बाहेर पडण्यास मुभा आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 5, 2021, 8:27 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY