महाराष्ट्रातील रस्तेविकास प्रकल्पांसाठी 2500 कोटी पेक्षा अधिकचा निधी मंजूर
नवी दिल्ली, : महाराष्ट्रातील विविध रस्ते विकास प्रकल्पांसाठी केंद्रीय भुपृष्ठ व परिवहन मंत्रालयाकडून 2500 कोटी पेक्षा अधिकाचा निधी मंजूर करण्यात आला. केंद्रीय भुपृष्ठ व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून देशभरातील विविध राज्यातील विकासकामांसाठीच्या निधीला मंजुरी दिल्याचे टि्वट केले. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध राष्ट्रीय महामार्गांच्या कामांसाठी 2500 कोटी रूपयांच्या पेक्षा अधिकचा निधी मंजुरी केल्याची माहिती दिली. यामुळे राज्यातील रस्त्यांचे जाळे अधिक बळकट होईल. यामध्ये कोकण ते विदर्भातील दुर्गम भागांचाही समावेश आहे.
या रस्तेविकास प्रकल्पांसाठी निधी मंजूर
परळी ते गंगाखेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 F च्या अद्यावतीकरण आणि पुर्नवसन साठी 224. 44 कोटी रूपयांचा निधी तर आमगाव ते गोंदिया राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 543 साठी 239.24 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. 28.2 किलोमीटर असलेल्या तिरोरा ते गोंदिया राज्य महामार्गाचे अद्यावतीकरण आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 यासाठी 288.13 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 सी वरील 262 किमी ते 321 किमीच्या दरम्यान लहान मोठे 16 पूल बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी 282 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याबाबतही माहिती दिली. नांदेड जिल्ह्यातील येसगी गावामध्ये मांजरा नदीवर पूल बांधण्यासाठी 188.69 कोटी रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला. नागपूरमधील आरटीओ चौक ते नागपूर विद्यापीठ परिसर असा उड्डाणपूल बांधण्यासाठी तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील वाडी-एमआयडीसी जंक्शन येथे चार पदरी उड्डाणपूल बांधण्याची परवानगी देण्यात आली. यासाठी 478.83 कोटी रूपयांचा निधीला मिळाली.
तारेरे-गगनबावडा- कोल्हापूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 च्या अद्यावतीकरणासाठी 167 कोटी रूपयांचा तर वाटूर ते चारटाण या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 साठी 228 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
गुहागर ते चिपळूण हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 ई च्या अद्यावतीकरणासाठी 171 कोटी रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला. जळगाव-भद्रा-चाळीसगाव-नांदगाव-मनमाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 च्या विस्तारीकरणासाठी 252 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 2, 2021, 11:18 am- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY