Breaking News

दुःखद:भाजपच्या माजी आमदाराचे कोरोनाने निधन, मुंबईतील रुग्णालयात सुरू होते उपचार

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 12, 2021 12:58 pm
|

पालघर : कोरोना संक्रमणामुळे डहाणूचे माजी आमदार भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष पास्कल धनारे यांचे निधन झाले आहे. मुंबईतील नानावटी रुग्णालयामध्ये सोमवार दिनांक 12 एप्रिल रोजी पहाटे 4.30 वाजता वयाच्या 49 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. . धनारे हे पालघरच्या डहाणू मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. यापूर्वी त्यांना वापीच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची परिस्थिती गंभीर झाल्यानंतर त्यांना मुंबईच्या रुग्णालयात हलवण्यात आले.

पास्कल हे डहाणूचे भाजपचे माजी आमदार व भाजपचे माजी पालघर जिल्हाध्यक्ष होते. त्यांच्या पाश्चात पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे. गेल्या दहा दिवसांपासून धनारे यांच्यावर गुजरातमधील वापी येथील रेम्बो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र रविवारी रात्री त्यांची तब्येत बिघडली यानंतर त्यांना मुंबईत हलवण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान त्यांची आज (सोमवार) सकाळी प्राणज्योत मालवली. पास्कल धनारे 2014 ते 2019 या काळात पालघरमधील डडाणू मतदारसंघातून आमदार राहिले आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीत तलासरी सारख्या भागात भारतीय जनता पार्टीचे काम वाढवुन पार्टी पालघर जिल्ह्यात उभा करणारा नेता हरपला. त्यांच्या जाण्याने पार्टीचे व जिल्ह्याचे न भरून निघणारे असे नुकसान झाले आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 12, 2021, 12:58 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *