नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्!, जबाबदार असणाऱ्याची गय केली जाणार नाही :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नाशिक: राज्यात आधीच ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णांना ICU बेड उप्लब्ध होत नाहीत. अशात आता ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकमधील झाकीर हुसैन रुग्णालयातील ऑक्सिजन टँकमधून गळता सुरु झाली आहे. या रुग्णालयात तब्बल 150 रुग्ण दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 23 जण व्हेंटिलेटरवर होते. त्यातल्या 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, या दुर्घटनेस जबाबदार असेल तर त्याची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे. अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, घटनेतील मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.
याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेडस् नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने 22 रुग्णांना प्राण गमवावे लागले. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. एकाएका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करीत असताना असा अपघात आघात करतो. राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वतःला वाहून घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे. या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईलच.
महाराष्ट्र शोकमग्न आहे!
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे pic.twitter.com/l4cBfMOxEO— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 21, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 21, 2021, 5:40 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY