विधिमंडळातल्या विरोधकांची संख्या कमी करण्यासाठी हा एका नियोजित कटाचा भाग
मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान गदारोळ उडाला. अध्यक्षांनी भुजबळांना बोलण्यास सांगितल्यानं भाजपचे आमदार आक्रमक झाले. भाजपच्या आमदारांनी अध्यक्षांच्या समोर वेलमध्ये येऊन जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर एका आमदाराने अध्यक्षांचा माईक ओढला. या गदारोळात सत्ताधारी तसेच भाजप आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. एवढेच नव्हे तर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनाही धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा आरोप होत आहे. त्यानंतरही १२ आमदारांवर कारवाई करण्यात आली आहे..हे निलंबन करण्यापूर्वी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आपली बाजू मांडली. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली बाजू मांडली. देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली की, अशी कारवाई करू नका,
काय आहे प्रकरण
दरम्यान , छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाबाबत विषय मांडत असताना तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी प्रस्ताव आधी वाचा आणि मग विरोधी पक्षाने मांडलेल्या मुद्द्यांना उत्तरे द्या, असे सूचित केले आणि तिथेच ठिणगी पडली. भुजबळांनी मांडलेल्या प्रस्तावाला आणि मुद्द्यांना विरोधी भाजपला प्रत्युत्तर द्यायचे होते. पण तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी त्याची परवानगी दिलेली दिसली नाही. त्यामुळे विरोधी सदस्य चिडले आणि नंतरचे महाभारत झाले. आणि नेमका हाच सापळा होता. विरोधकांनी आपल्या चर्चेचा रोख अजित पवार आणि अनिल परब यांच्याकडे वळविण्यापूर्वीच सत्ताधारी आघाडीने ओबीसी आरक्षणाबाबतचा विषय मांडला. भास्कर जाधवांनी प्रस्ताव आधी वाचा आणि मग बोला अशी सूचना केली. त्यानंतर विरोधी सदस्यांना बोलण्याची परवनागी दिली नाही. यातून हे नाट्य घडविण्यात आल्याचे स्पष्ट दिसून आले.
विरोधी बाकांवर १०६ भाजप आमदारांमधले १२ आमदार वर्षभरासाठी सदनात नसण्याची शक्यता आहे. त्यावेळी सत्ताधाऱ्यांना आपले कामकाज रेटून नेण्याची संधी मिळेल. तसेच आपले सदस्य कमी झाले तरी अडचण येऊ न देण्याची “अशी व्यवस्था” सत्ताधाऱ्यांनी केली, अशी विधिमंडळ परिसरात अटकळ बांधली जात आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 5, 2021, 4:50 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY