जव्हार: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा ग्रामीण भागात उद्रेक, रुग्णांच्या संख्येत वाढ तर मृत्यूचा आकडा २५ पार
जव्हार: सध्या संपूर्ण भारतात कोरोना संसर्गाने मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या संख्याही वाढत असून पालघर जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम असलेल्या जव्हार तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या स्थितीत जव्हार मध्ये एकूण १०२९ रुग्ण दवाखान्यात उपचार घेत असून आता पर्यत २५ व्यक्तींचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागात ताप, सर्दी, व खोकला असलेलं रुग्ण घरी बसून हा आजार अंगावर काढत आहेत.तसेच कोरोना संदर्भात ग्रामीण भागातील लोकांमध्ये अनेक गैरसमज व भीती पसरली आहे. सुरवातीला कोरोना ची पहिली लाट जेव्हा आली तेव्हा याबाबत स्थानिक आरोग्य यंत्रणा गावात जाऊन कोरोना तपासणी करण्यासाठी गेले असता गावातील लोक जंगलात पळून जात आसल्याचे मत तालूका आरोग्य अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सांगितले असून याबाबत खंत व्यक्त केलीय . त्यानंतर जव्हार तालुक्यातील अनेक गावांमध्ये अशी लक्षणे असलेले पेशंट च्या मृत्युची आकडेवारी वाढ झाली. तेव्हा पासून आता कोरोना तपासणी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सकाळ पासून मोठ्या मोठ्या रांगा गर्दी होत आहे. याबाबत गावागावात आरोग्य यंत्रणा मार्फत आशा वर्कर किंवा स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेऊन तपासणी किंवा जनजागृती करण्याची गरज आहे.
जव्हार तालुक्यातील जेव्हा कोरोना ची पहिली लाट आली तेव्हा, ग्रामपंचायत मार्फत कोरोना विषयी जनजागृती, व इतर लागणारी औषध यावरती ग्रामपंचायतने अगोदर सर्व निधी खर्च केला आहे, असं ग्रामस्थांच मत आहे. सध्या च्या स्थितीत कोरोना रुग्णांची संख्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढत असून याबाबत ग्रामपंचायत,गावातील आरोग्य यंत्रणा किंवा स्थानिक प्रशासन कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने सध्या गावागावात सर्दी, ताप, खोकला,हातपाय दुःखी असे रुग्ण जर गावात आढळत असतील तर अशा रुग्णांना समुपदेशन करण्याची अत्यंत गरज आहे. जर या बाबत गावपातळीवर योग्य नियोजन झाले नाही तर, पुढील येणारी तिसरी लाट मध्ये ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढण्याची दाट शकता आहे .तसेच पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा या अतिदुर्गम आदिवासी भागात पुर्वी पासून आरोग्याच्या मुबलक सुविधा नसल्याने सध्याच्या स्थितीत कोरोना रूग्णांना ऍडमिट करण्यासाठी फक्त एकच कोविडं सेंटर असून त्या ठिकाणी मुबलक सुविधा उपलब्ध नाही तरी या बाबत अनेक वेळा कोविडं रुग्णांसाठी स्वतंत्र ५० ते १०० बेड चे रुग्णालयात सुरू करावे अशी मागणी नागरिक करीत आहे.याकरिता पालघर जिल्हाधिकारी यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व पालकमंत्री यांच्या कडे करून पाठपुरावा करावा ,सध्या च्या स्थितीत जव्हार मोखाडा वरून पेशंट रिव्हेरा हॉस्पिटल विक्रमगड येथे पाठवले जातात मात्र तिथे ही रुग्णाची संख्या अतिरिक्त असल्याने सध्या मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे.
याबाबत शिवसेना जव्हार शहरप्रमुख परेश पटेल यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, मी स्वतः कोरोना पोझेटिव्ही आलो होतो व तेव्हा मी जव्हार च्या कोविडं सेंटर मध्ये ऍडमिट होतो, त्या नंतर मी स्वतः जेव्हा कोरोना मधून बाहेर पडलो त्या नंतर येथील सर्व रुग्णांची परिस्थिती बघून स्वतः स्वयंस्फुर्तीने कोविडं सेंटर मधील रुग्णाच्या मदतीला धावून आलो आहे. व मृत्यु झालेल्या व्यक्तींच्या बॉड्या उचलून स्वतः रुग्णवाहिकेत घेऊन जात आहे .सोबत युवासेना जव्हार चे कार्यकर्ते प्रशांत वनमाळी, ललित चाफेकर साजिद सय्यद,हे मदत करित असून सध्याच्या स्थितीत कोरोना रुग्णांच्या मदती करण्यासाठी स्वतः स्वयंसेवक म्हणून पुढे यावे असे आवाहन करत आहे.
तर या संदर्भात तालूका आरोग्य अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी प्रतिक्रिया दिली सध्या जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून, गावातील अनेक रुग्णांना ताप, सर्दी, खोकला, अशी लक्षणे असलेल्या रुग्ण, स्वतः हुन पुढे येत नाही, तरी या बाबत गावातील युवकांनी स्वयंसेवक म्हणून मदतीला येणाची गरज आहे.तसेच लग्नकार्य,साखरपुडा, किंवा इतर विधी या सारखे गर्दी चे कार्यक्रम रद्द करावे, प्रशासनाला सहकार्य करावे जेणे करून ग्रामीण भागातील कोरोनाची साखळी तोडू शकतो.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 18, 2021, 5:50 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY