संपूर्ण राज्य आता तिसऱ्या स्तरात, तिसऱ्या टप्प्याचे निर्बंध सर्व जिल्ह्यात लागू, नवी नियमावली जारी
मुंबई . आजच रत्नागिरीमध्ये डेल्टा प्लस कोविड वेरिएंट बाधित एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने सरकार पुन्हा अॅक्शन मोड मध्ये आले आहे. संभाव्य तिसरी लाट थोपवण्यासाठी आज अनलॉक नियमावलीमध्ये बदल करण्यात आले आहेत.महाराष्ट्रात येत्या सोमवार(28 जून) पासून लेव्हल 1 आणि 2 वर असणारे सारे जिल्हे आपोआपच लेव्हल 3 वर येणार आहेत. आणि या नव्या नियमावलीची अंमलबजावणी करणं बंधनकारक असणार आहे. यामध्ये नियम मोडणार्यांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना नियमाचे उल्लंघन केल्यास प्रत्येक व्यक्तीस एक हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. तर हॉटेल व्यवस्थापनास दहा हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. या कारवाई नंतरही नियमांचे उल्लंघन केल्यास महिनाभर बंद ठेवण्याची कार्यवाही केली जाणार आहे, असे आदेशात म्हटले आहे.
कोरोना पॉझिटिव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडच्या निकषानुसार जिल्ह्याचा अद्यापही तिसऱ्या टप्प्यातच समावेश होत आहे. अद्यापही कोरोना बाधितांचा आकडा आठशेच्या खाली आलेला नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील कोरोनाचे निर्बंध पुढील आदेश येईपर्यंत कायम ठेवले आहेत. या बाबतचे नवे आदेश आज जारी केले आहेत. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी रेस्टारंट, हॉटेल्सना काही सवलत लागू केली आहे.
लेव्हल 3 निर्बंधांअंतर्गत काय सुरू राहील काय बंद राहणार?
मॉल, थिएटर्स बंद राहणार आहेत तर रेस्टॉरंट दुपारी 4 वाजेपर्यंतच डाईन ईन मध्ये सुरू राहतील. एरवी पार्सल सेवा, होम डिलेव्हरी सुरू राहणार आहे.
लग्न सोहळ्यात कमाल 100 आणि हॉलच्या 50% उपस्थितीला परवानगी, अंत्यविधीला केवळ 20 जणांना परवानगी असेल.
सामान्य मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन बंद राहतील. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी ग्राह्य पास व ओळखपत्राच्या आधारे प्रवास करू शकतात.
शनिवार, रविवार सारी दुकानं बंद राहतील.
सलून, जिम 50% क्षमतेने आणि नियमावलीनुसार खुली राहतील.
दरम्यान आज जारी करण्यात आलेल्या नव्या नियमावलीनुसार, राज्यात आता आरटीपीआर टेस्टच्या आधारेच आठवड्याचा पॉझिटीव्हिटी रेट पाहिला जाणार आहे. तसेच वरच्या लेव्हल मध्ये जाण्यासाठी आता जिल्ह्यांचा सलग 2 आठवड्यांचा पॉझिटीव्हिटी रेट पाहून मुभा दिली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील सर्व जिल्हाधिकार्यांना संभाव्य तिसर्या लाटेचा धोका पाहता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 25, 2021, 10:00 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY