Breaking News

जगात कुठेही एकाच गोष्टीचे तीन वेगळे दर असू शकत नाही, पण मोदी है, तो मुमकीन है ! नाना पटोले यांची टीका

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 3, 2021 2:41 pm
|

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लसीच्या दरासंबंधी केंद्र सरकारने निशाणा साधला आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांने हे भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी मुद्दयाना हात घेतला . यावेळी पटोले लसीच्या दरासंबंधी बोलताना म्हणाले की, देशातील निर्माण झालेल्या अशा परिस्थितीत केंद्र सरकारने सर्व जबाबदारी घ्यायला हवी होती. पण पंतप्रधानांनी राज्यांना जबाबदारी घेण्यास सांगितले. त्यावेळी दर निश्चित करण्यात आले. पण जगात कुठेही एकाच गोष्टीचे तीन वेगळे दर असू शकत नाही. पण मोदी है, तो मुमकीन है असेच दिसत असल्याचे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली . रेमडेसिविर सरकारने खुल्या बाजारात आणले असते, तर काळाबाजार झालाच नसता असा आरोप देखील त्यांनी केला . केंद्र सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे देशातील लोकांचे जीव जात आहेत. केंद्रातील सरकार सातत्याने लोकांच्या जीवाचे राजकारण करत असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे.

त्याचबरोबर नाना पटोले म्हणाले की, पुनावालांनी भारतात यावे, त्यांच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी काँग्रेस घेईल. त्यांना धमक्या देणाऱ्या राजकीय नेत्यांची नावे त्यांनी जाहीर करायला हवीत. ते म्हणाले , अदर पूनावाला यांना केंद्र सरकारने न मागता वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. यामागे काय लपले आहे हे वास्तव समोर आले पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचेही पटोले म्हणाले आहेत.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 3, 2021, 2:41 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *