राजेश टोपेंची हकालपट्टी करा- किरीट सोमय्या
मुंबई : आज ठाण्यातील वेदांत रुग्णालयात ऑक्सिजन अभावी ४ रुग्णांचे जीव दगावले. या घटनेनंतर भाजपने पुन्हा ठाकरे सरकारवर संताप व्यक्त केला. रोज वेगवेगळ्या रुग्णालयात कधी आगीमुळे तर कधी ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे. मात्र आरोग्य मंत्री फक्त भाषण करत फिरतात. इतक्या घटना घडत असताना आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांची हकालपट्टी का करत नाही? असा सवाल भाजप खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे.
आज ठाण्यातील वेदांत रुग्णालयात ऑक्सिजनअभावी ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासन आणि मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालयाच्या परिसरात पोलिसांचा ककडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परंतु, या रुग्णांचा मृत्यू नेमके कशामुळे झाला? ऑक्सिजन अभावी झाला की, अन्य कारणांमुळे याबाबत अद्यापही रुग्णालय प्रशासनाने माहिती दिलेली नाही.
यासंदर्भात मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. यासाठी ६ सदस्यीय समितीची स्थापना केली जाणार आहे. यामध्ये पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, सिव्हिल रुग्णालयाचे सर्जन अशा वेगवेगळ्या तज्ज्ञांचा समावेश असणार आहे. जे या प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहेत.” अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 26, 2021, 9:12 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY