Breaking News

रात्रीच्या अंधारात आरेतील झाडे ज्यांनी कापली ते कोकणात जावून झाडांची चिंता व्यक्त करतात : ‘, काँग्रेस नेत्याची सडकून टीका

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 24, 2021 5:29 pm
|

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. रात्रीच्या अंधारात आरेतील झाडे ज्यांनी कापली ते कोकणात जावून झाडांची चिंता व्यक्त करतायत. जरा तपासून घ्या स्वत:ला’ अशा शब्दांत काँग्रेसचे मुंबई शहर अध्यक्ष भाई जगताप यांनी टीकास्त्र सोडले आहे.

भाई जगताप यांनी मुंबई पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला. ‘केंद्र सरकार काही राजा नाही. त्यांनी सर्वांना मदत करायला हवी. आपली नैतिकता त्यांनी गुजरातला बांधलीय. गुजरातला मदत केली मग इतर राज्यांना का नाही ? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 हजार कोटींचे पॅकेज द्यावे. परंतु, त्यांचा महाराष्ट्रद्वेष पाहता ते काही देतील अशी अपेक्षा नाही,परंतु महाराष्ट्र सरकारने चांगली मदत करावी, असंही भाई जगताप म्हणाले.

म्युकर मायकोसिसवरील औषधे आता केंद्राच्या परवानगीशिवाय राज्यांना विकत घेता येणार नाहीत. केंद्राकडून राज्याला सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे. कालपर्यंत आम्ही रक्ताचे 7 हजार युनिटस रक्तादानाद्वारे जमवले आहे. 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्राने ढकलण्याचे काम केले आहे. 93 देशांना आमची लस विकण्यात आली. 17 देशांतून लशीसाठी कच्चा माल येतो, त्यांना लस द्यायचा करार आहे. मग 93 देशांना का लस विकली?’ असा सवाल भाई जगताप यांनी विचारला आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 24, 2021, 5:29 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *