‘गदर’ चित्रपटाच्या निर्मात्यांच्या पत्नी आणि मुलीने “यामुळे” स्वतःला घेतले पेटवून
मुंबई :चित्रपट निर्माता संतोष गुप्ता यांची पत्नी अस्मिता आणि मुलगी सृष्टी यांनी आत्महत्या केली आहे दोघांनीही घरातच स्वतःला पेटवून घेऊन जीव दिला. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी सांगितले की अंधेरीमध्ये 55 वर्षीय एका महिलेने आपल्या मुलीसह घरात आग लावून आत्महत्या केलीये. तपास केल्यानंतर समजले की महिला आणि मुलगी चित्रपट निर्माता संतोष गुप्ता यांची पत्नी आणि मुलगी आहे. त्याची पत्नी बर्याच दिवसांपासून किडनीच्या आजाराने ग्रस्त होती. शहरातील उपनगरीय भागात असलेल्या अंधेरी येथे एका 55 वर्षीय महिलेने आपल्या मुलीसह घरात आग लावून आत्महत्या केली. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, अस्मिता गुप्ता ही आत्महत्या करणारी महिला बॉलीवूड चित्रपट निर्माते संतोष गुप्ताची पत्नी होती. ते म्हणाले की, सोमवारी दुपारी अंधेरी (पश्चिम) येथील डी.एन.नगर येथील आई-मुलीने स्वत: ला पेटवून घेऊन आत्महत्या केली आणि शेजार्यांनी अग्निशमन विभागाला हा प्रकार सांगितला, तेव्हा ही बाब उघडकीस आली.
अधिका-यांनी सांगितले की दोघांना तातडीने कूपर रुग्णालयात नेण्यात आले. जेथे अस्मिताला मृत घोषित करण्यात आले होते, तर 70 टक्क्यांपर्यंत जळून गेलेल्या सृष्टीचे मंगळवारी ऐरोली राष्ट्रीय बर्न्स सेंटर येथे निधन झाले.
प्राथमिक तपासणीनुसार अस्मिताने बर्याच दिवसांपासून मूत्रपिंडाचा आजार होता आणि तिच्या मुलीने आईच्या आजारामुळे आत्महत्या केली. डीएन नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भरत गायकवाड म्हणाले, “आम्ही या प्रकरणात अपघाती मृत्यूचे दोन स्वतंत्र केस दाखल केल्या असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.”
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 8, 2021, 9:46 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY