मानवीय कृत्य; महाभयंकर! बीडमध्ये एकाच रुग्णवाहिकेत 22 मृतदेह कोंबले; नंतर तीच रुग्णवाहिका रुग्णांसाठी वापरल्याचा प्रकार उघड
बीड : जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एकाच रुग्णवाहिकेतून तब्बल 22 मृतदेह कोंबून नेण्यात आले.स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कोरोनामुळे मृत झालेल्या तब्बल 22 रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. एकाच वाहनात असे मृतदेह कोंबल्यावरून रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे.दरम्यान, याच रुग्णवाहिकेतून नंतर रुग्णांचीही ने-आण केली जाते. स्वाराती रुग्णालयाच्या कारभारावर नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
काय आहे घटना?
अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या तब्बल 22 रुग्णांचे मृतदेह एक रुग्णवाहिकेत कोंबण्यात आले. 22 मृतदेहांना स्मशानभूमीकडे नेण्यासाठी एकाच रुग्णवाहिकेचा वापर करण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. मृत्युनंतरही कोरोनाबाधितांच्या वाट्याला अवहेलना आल्याने रुग्णालयाच्या प्रशासनाविरोधात टीकेची झोड उठली आहे. रविवारी हा धक्कादायक घटना उघडकीस आली. यावर रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे की, रुग्णवाहिकाच उपलब्ध नसल्याने एकावर एक टाकून मृतदेह न्यावे लागले.
स्वारातीमध्ये फक्त दोनच रुग्णवाहिका
अंबाजोगाच्या स्वाराती रुग्णालयात केवळ दोनच रुग्णवाहिका आहेत. कोरोनामुळे संकट वाढलेलं असताना आणखी 5 रुग्णवाहिकांची मागणी करण्यात आली होती. याबाबत मार्च महिन्यात जिल्हा प्रशासनाला पत्रही पाठवण्यात आलं होतं. परंतु, अद्यापही रुग्णवाहिका मिळाली नसल्याचं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे. रुग्णवाहिकेअभावी सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. कोरोना संसर्गामुळे बीडसह अंबाजोगाईत भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. अंबाजोगाइच्या शासकीय रुग्णालयात इतर तालुक्यांतूनही मोठ्या प्रमाणावर रुग्ण दाखल होत आहेत. रुग्णसंख्येबरोबरच मृतांची संख्याही चिंता वाढवणारी आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 27, 2021, 3:44 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY