राज्याच्या जनतेसाठी राज्य सरकार कोणतीही गोष्ट करायला तयार: राजेश टोप
मुंबई – देशभरातील अनेक राज्यातून ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्यामुळे रुग्णांचे जीव जाण्यासारख्या दुर्दैवी घटना देखील घडल्या असताना महाराष्ट्रात देखील गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.रुग्णांचा आकडा सातत्याने वाढताना दिसतोय. दरम्यान राज्यात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. याविषयीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे महत्त्वाची मागणी केली आहे. ‘ऑक्सिजनचा पुरवठा केला जावा यासाठी राज्य सरकार केंद्राच्या पाया पडायलाही तयार आहे’ असे राजेश टोपे म्हणाले.
माध्यमांशी संवाद साधताना राजेश टोपे म्हणाले की, ‘राज्य सरकार अक्षरश: नम्र विनंती करायला तयार आहे, ऑक्सिजन मिळवण्यासाठी राज्य सरकार पाया पडायलाही तयार आहे. राज्याच्या जनतेसाठी राज्य सरकार कोणतीही गोष्ट करायला तयार आहे. ऑक्सिजन उपलब्धता कोटा वाटप हे केंद्र सरकारकडून केला जातो. महाराष्ट्राला केंद्राने जास्त कोटा दिला पाहिजे. तसेच ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी सुरक्षित ट्रान्सपोर्ट कॉरिडोअर उपस्थित करुन द्यावा’ अशी मागणीही राजेश टोपेंनी केंद्राकडे केली.
पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले की, ऑक्सिजनच्या संदर्भात आपल्याला ऑक्सिजन जनरेटर प्लांटवर किंवा ऑक्सिजन निर्माण होणाऱ्या प्लांटवर अवलंबून राहावे लागणार आहे. यासाठी आपण प्रयत्न करणार आहेत. उद्योगधंद्यांमध्ये सुध्दा पीएसए टेक्नोलॉजीचे प्लांट आहेत. त्यांचा देखील आपण वापर करू शकतो का? याची चाचपणी सुरू असल्याचे राजेश टोपे यावेळी म्हणाले. सध्या आपल्याकडे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, ऑक्सिजन जनरेटर्स हे उपाय आहेत. केंद्राकडे देखील आपण मदतीचा हात मागत असल्याचे देखील ते म्हणाले आहेत.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 22, 2021, 4:14 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY