Breaking News

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई हायकोर्टाकडून झटका; सीबीआयच्या FIR ला आव्हान देणारी याचिका फेटाळली

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 6, 2021 3:18 pm
|

नवी दिल्लीः महाराष्ट्र सरकार आणि अनिल देशमुखांना मोठा झटका बसला आहे.कारण मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह ( parambir singh ) यांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप अत्यंत गंभीर आहे, असं निरीक्षण नोंदवत सुप्रीम कोर्टाने ( supreme court ) माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख ( anil deshmukh ) यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने आता अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी होणार आहे. सीबीआयची टीम ही मुंबईत चौकशीसाठी दाखल झाली आहे.

परमबीर सिंह यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी करण्यात येत आहे. हायकोर्टाने अनिल देशमुख यांना निर्देश दिले आहेत की, आवश्यकता असल्यास त्यांचा खटला हायकोर्टाच्या सुट्टीतील खंडपीठकडे स्थलांतरीत करण्यात यावा. देशमुख यांच्या याचिकेवर 4 आठवड्यांत उत्तर दाखल करण्यास उच्च न्यायालयाने सीबीआयला सांगितले आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी कोर्टाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर होईल.

निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणावरून परमबीर सिंह यांना मुंबईच्या पोलिस आयुक्त पदावरून हटवण्यात आलं. यावरून . मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. परमबीर सिंह यांनी सुमारे दीड महिन्यांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात अनिल देशमुख यांनी निलंबित मुंबई पोलिस अधिकाऱ्याला दरमहा 100 कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता.अनिल देशमुख यांनी हे आरोप फेटाळून लावले. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर देशमुख यांना या पदाचा राजीनामा द्यावा लागला. सध्या त्यांची सीबीआय चौकशी सुरू आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक कार प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांचे एपीआय सचिन वाझे यांचे नाव समोर आल्यानंतर वाद वाढला आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 6, 2021, 3:18 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *