Breaking News

आमदार सुनिल भुसारा यांचा मागण्याना यश ,जिल्हाधिकारी यांची भेट घेवून केल्या होत्या मागण्या

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 8, 2021 1:00 pm
|

मोखाडा : सध्या कोरोनाने शहरी भागाप्रमाणेच जव्हार वाडा मोखाडा विक्रमगड या तालुक्यांतील ग्रामीण भागात देखील मोठ्याप्रमाणावर शिरकाव केल्याने अतिशय गंभीर स्थिती निर्माण झालेली आहे यामुळे आमदार सुनिल भुसारा यांनी तात्काळ जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांची भेट घेवून वाढणारी रुग्णांची संख्या कमी पडत असलेले ऑक्सीजन व्हेंटीलेटर बेड रेमडेसीवर ईंजेक्शनची जाणवणारी कमतरता या सगळ्या बाबतीत माहिती देत चर्चा केली आणि ग्रामीण तालुक्यांत अधिक लक्ष देण्याची मागणी केली.याशिवाय गतसाल पासून अनेक वाहनांची रखडलेली भाडीही तात्काळ देण्याची मागणी केली.

यावेळी जिल्हाधिकारी गुरसळ यांनी मोखाडा जव्हार विक्रमगड या भागातील कोवीड सेंटर मध्ये आता उपलब्धतेनुसार ऑक्सीजन बेडची निर्मिती करण्याचे सांगितले असून मोखाड्यातही किमान ऑक्सीजनचे २० बेड आजपासूनच सुरु करणार असल्याचे सांगितले तर जव्हार मध्ये ३० ऑक्सीजन बेड सुरू करण्याचे सांगितले याशिवाय जव्हार मोखाडा याठीकाणीच रेमडेसीवर ईंजेक्शन सुद्धा मागणी नुसार उपलब्ध होणार असल्याचे सांगितले यावेळी रीवेरा एकमेव हॉस्पीटल असल्याने त्यावर जास्त भार येवून आमच्या भागातील अनेकांना कधी कधी बेड उपलब्ध नसतो असे आमदार भुसारा यांनी सांगितले याला उत्तर देताना जिल्हाधिकारी यांनी त्यावरचा ताण हलक व्हावा यासाठी आता मोखाडा जव्हार मध्ये ऑक्सीजन बेड तयार अगदी आजपासूनच सुरू करण्याचे सांगितले.तर गतसालापासुन कोरोना काळात भाडेतत्वावर चालवलेल्या वाहनांची भाडी देण्याची मागणी भुसारा यांनी यावेळी केली तेंव्हा ही भाडी तात्काळ आठ दिवसांच्या आत देणार असल्याचे सांगितले.

जव्हार येथे सध्या ऑक्सीजन प्लांट निर्मितीचे काम सुरू असले तरीही याभागातील आरोग्याची आबाळ येथील कुपोषण बालमृत्यू माता मृत्यू कोरोनासारख्या संकटात अडचणीत सापडेला आरोग्य विभाग अशी सगळी स्थिती पाहता जव्हार मोखाडा विक्रमगडसाठी कायमस्वरूपी ५० टन क्षमतेच्या ऑक्सीजन प्लांटची निर्मिती व्हावी अशी आमदार सुनिल भुसारा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे यामुळे लवकरच जव्हार येथे शासनाच्या निधीतून निर्माण होणाऱ्या या प्लांटला ही मंजूरी मिळणार असल्याचे चित्र आहे.भुसारा यांच्या या तत्पर मागणी मान्य करून घेण्याच्या कामाचे कौतुक होत असून येत्या काळात कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी येथील आरोग्य विभागाला अधिक सक्षम करणार असल्याचे भुसारा यांनी सांगितले.

विक्रमगड विधानसभा मतदारसंघात १२ रुग्णवाहिका दिल्यानंतर आरोग्य विभागाला अच्छे दिन आले आहेत मात्र आता पुन्हा माझ्या आमदार निधीतून १२ रुग्णवाहिका देणार असल्याचे भुसारा यांनी यावेळी जिल्हाधिकारी यांना सांगितले असून तशी शासकीय प्रक्रीयाही पुन्हा सुरू झाली आहे या रुग्णवाहिका मतदारसंघातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला आणि वाडा रुग्णालयाला असेल असे भुसारा यांनी सांगितले. तर मतदारसंघाती प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी ऑक्सीजन प्लांट निर्मितीसाठीही निधी उपलब्ध होणार असून त्यासंदर्भातचा शासकीय आदेशही आला असल्याचे भुसारा यांनी सांगितले.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 8, 2021, 1:00 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *