विकृतीचा कळस! ठाण्यात भटक्या कुत्र्याला जाळले, गुन्हा दाखल
ठाणे : येथील कॅसल मिल भागात एका भटक्या श्वानाला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात लोकांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका अधिकाऱ्याने शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, सिटीझन फॉर अॅनिमल प्रोटेक्शन फाउंडेशनच्या 20 वर्षीय सदस्याने राबोडी पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली.
मंगळवारी संध्याकाळी मसानवाडा येथे तक्रारदाराला भटका कुत्रा जाळल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर तो घटनास्थळी गेला आणि त्याने त्या कुत्राला अर्धजळलेल्या अवस्थेत पाहिले. त्यानंतर त्यांने कुत्र्याला तात्काळ पशू रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथेचं कुत्र्याचा मृत्यू झाला.भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम 429 (गुरेढोरे मारहाण करणे किंवा पळवून नेणे इ.) आणि प्राणी प्रतिबंधक क्रौर्य प्रतिबंध कायद्यान्वये अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी देखील असे प्रकार समोर आले आहेत. श्वानाला जाळून हत्या केल्याचे पाहून संताप व्यक्त केला जात आहे’.
https://twitter.com/ADVOCATEPATOLE/status/1382941985095380996
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 16, 2021, 5:34 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY