महाविकास आघाडी सरकार राज्यात स्व. राजीव गांधींच्या नावाने पुरस्कार देणार
मुंबई : केंद्र सरकारने दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने 1992 पासून सुरू असलेल्या खेल रत्न पुरस्कारांचे नाव बदलून आता हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या नावाने ठेवले आहे. पुरस्काराचे नाव ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार’ असे करण्यात आले आहे. यानंतर या मुद्द्यावरून वाद सुरू झाला आहे. खेलरत्न पुरस्काराच्या नावावरून वाद सुरु असताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राजीव गांधी यांच्या नावाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्याऱ्या संस्थांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. राजीव गांधी यांच्या स्मृती दिनी म्हणजेच २० ऑगस्टला हा पुरस्कार दिला जाणार आहे. माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.
दरम्यान सतेज पाटील यांनी ट्विट करून याची माहिती देत म्हटलं,“माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री म्हणून सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे की, विज्ञान आणि तांत्रिक ज्ञानाचा वापर हा देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी गरजेचा आहे. राजीव गांधींनी आयटीच्या प्रचार आणि प्रसारात अमूल्य योगदान दिले होते. हेच कारण आहे की, त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त, या क्षेत्रात नावीन्यपूर्ण संशोधन करून समाजाच्या विकासात योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अशाप्रकारे आता हा पुरस्कार दरवर्षी राज्य सरकारकडून दिला जाईल. परंतु असेही म्हटले गेले की, या पुरस्कारामुळे आयटी विभागावर आर्थिक भार पडणार नाही, अशी व्यवस्था करावी. या पुरस्काराअंतर्गत पात्र उमेदवारांची निवड आणि पुरस्काराच्या नियोजनाची जबाबदारी महाराष्ट्र आयटी महामंडळाला देण्यात आली आहे. हा पुरस्कार दरवर्षी राजीव गांधी स्मृतिदिनी म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी दिला जावा, हे संबंधित परिपत्रकात लिहिलेले आहे. राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय ७ जुलै २०२१ रोजी घेतला आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: August 11, 2021, 1:41 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY