दहावी निकालाची वेबसाइट झाली क्रॅश, विद्यार्थी आणि पालकही वैतागले
मुंबई : आज शुक्रवारी, दि. १६ जुलै रोजी दुपारी १ वाजल्यापासून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीच्या परीक्षा यंदा कोरोनामुळे न घेताच निकाल जाहीर करण्यात आला.विद्यार्थी ज्या बोर्डाच्या वेबसाइटवर आपले गुण किती हे पाहण्यासाठी आतुर झाले होते. ती साइटच निकालावेळी क्रॅश झाल्याने विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे निकाल लागूनही तो दिसत नसल्याने विद्यार्थी आणि त्यांचे पालकही वैतागले .
मात्र, संकेतस्थळ टाकताच ते हॅंग झाल्याचे दिसून आले. बराच वेळ निकालाचे संकेतस्थळ न उघडल्याने पालक आणि विद्यार्थी हैराण झाले. त्यामुळे पालकांनी कुठे दुसरीकडे संकेतस्थळ सुरू होते काय? याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तब्बल तीन तास उलटूनही अद्याप निकाल मिळालेला नाही. त्यामुळे अनेक मुलांची निराशा झाली. बोर्डाकडून निकालासाठी दोन साईट देण्यात आल्या होत्या. मात्र, सर्वज्ञच ही समस्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत बोर्डाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता निकालाचा संकेतस्थळातील ‘सर्व्हर’मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने राज्यात ही समस्या असल्याचे सांगितले. त्यामुळे किमान सहा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना निकालच बघता आला नाही.मात्र या साईट क्रॅक झाल्यामुळे अद्यापही निकाल मिळालेला नाही. निकाल काय लागला हे न कळल्यानं पालकांमध्ये ही नाराज आहेत.
Websites not working, please do something…#ssc #results #internalassessment@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @bb_thorat @scertmaha @INCMaharashtra https://t.co/XIYq2Rj0UJ pic.twitter.com/5FC8frxlux
— Bharatwasi (@MANGESHRPAWAR) July 16, 2021
#sscresult2021@CMOMaharashtra @VarshaEGaikwad
10th board students from Maharashtra are still waiting for their results
It's almost 2 hrs and the site is not openingLook into the same
— Adv Anubha Shrivastava Sahai 🇮🇳 (@anubha1812) July 16, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 16, 2021, 5:35 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY