ठाणे महापालिकेस लिंडा कंपनीकडून अतिरिक्त 15 टन ऑक्सिजनचा पुरवठा : महापौर नरेश म्हस्के
ठाणे : गेल्या काही दिवसांपासून सर्वत्रच ऑक्सिजनचा पुरवठा अपुरा पडत होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांनी लिंडे कंपनीकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे लिंडे कंपनीने 15 टन ऑक्सिजन उपलब्ध करुन दिला होता. परंतु अतिरिक्त ऑक्सिजन उपलब्ध व्हावा यासाठी महापौर नरेश म्हस्के हे सतत लिंडे कंपनीशी संपर्क साधत होते. आज पुन्हा लिंडे कंपनीने ठाणे शहरास अतिरिक्त 15 टन ऑक्सिजन येत्या दोन दिवसात उपलब्ध करुन देणार असल्याचे त्यांनी आज झालेल्या बैठकीत नमूद केले.
महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त संदीप माळवी यांच्या उपस्थितीत आज लिंडे कंपनीच्या व्यवस्थापनाशी बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी महापालिकेस अतिरिक्त 15 टन ऑक्सिजन पुरविण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे आता ठाणे महापालिकेस अतिरिक्त ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होणार आहे.
ठाणे शहरात ऑक्सिजनचा पुरवठा अपुरा पडत होता, तसेच काही रुग्णालये ही ऑक्सिजन नसल्यामुळे सुरू करता येणे शक्य नव्हते. या पार्श्वभूमीवर महापौर नरेश म्हस्के हे ऑक्सिजन उपलब्ध होणेकरिता लिंडे कंपनीसोबत सतत पाठपुरावा करीत होते. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या बैठकीत त्यांनी ठाणे महापालिकेस 15 टन ऑक्सिजनचा अतिरिक्त पुरवठा देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे ठाण्यातील कोविड बाधित रुग्णांना आता लवकर उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा येथील रुग्णालय येत्या चार दिवस कार्यान्वित होणार असून निश्चितच कोरोनाबाधित रुग्णांना उपचार घेणे सोईचे होणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद करत लिंडे कंपनीने केलेल्या महत्वपूर्ण सहकार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 22, 2021, 6:38 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY