Breaking News

भिवंडी- वाडा-मनोर रस्ता सुसज्ज होईल :सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांची ग्वाही

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: August 11, 2021 5:58 pm
|

पालघर (वाडा):महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मनीष गणोरे यांनी काल सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण भेट घेतली. यावेळी संबंधित खात्याचे अधिकारी यांच्या सोबत बैठक झाली . या बैठकीमध्ये मंत्री महोदयांनी वाडा-भिवंडी-मनोर रस्त्यावर जे खड्डे पडलेले आहेत ते खड्डे तात्काळ भरण्याचे आदेश संबंधित विभागाला केली आहे.

दरम्यान , वाडा-भिवंडी रस्त्यावर रहदारी खूप असल्याने वाडा-भिवंडी रस्त्याचे काँक्रिटी करण व्हावे यावर चर्चा करण्यात आली. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी अनुकूलता दर्शवली आहे. वाडा -मनोर रस्त्यावर सापने व टेन जवळील पूल लवकरात लवकर वाहतुकी साठी चालु करू असं ठोस आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिले. तसेच भिवंडी- वाडा-मनोर हा रस्ता सुसज्ज होईल वाडा-भिवंडी – मनोर रस्त्यावर वन विभागाच्या क्षेत्रात असलेल्या जागे संदर्भात संबंधित विभागाशी यांच्याशी चर्चा करून समस्या सोडवू अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिली.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: August 11, 2021, 5:58 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *