Breaking News

‘तौक्ते’: चक्रीवादळ काही तासातच गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: May 17, 2021 8:57 pm
|

नवी दिल्ली : अरबी समुद्रातील तौकते चक्रीवादळाने सध्या मोठी चिंता निर्माण केली आहे. केरळ, कर्नाटक, गोव्यानंतर महाराष्ट्रात या अत्यंत भयंकर चक्रीवादळाने मोठी हानी केली आहे. अरबी समुद्रातून सुरू झालेले ‘तौक्ते’ वादळ काही तासातच गुजरातला पोहोचणार आहे. हवामान विभागानुसार संध्याकाळी 6.30 वाजता हे दीवपासून फक्त 50 किलोमीटर दक्षिण-पूर्वमध्ये आहे. मागील सहा तासात वादळाचा सरासरी वेग 17 किमी. प्रतितास होता परंतु मागील दीड तासात वादळाने 40 किमीचे अंतर पूर्ण केले आहे. हाच वेग राहिल्यास हे वादळ रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत सौराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता आहे.

गुजरातेत तब्बल 23 वर्षांनंतर एवढं तीव्र वादळ येत आहे, प्रशासनाने वादळाला सामोरे जाण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. एनडीआरएफच्या 100 हून जास्त पथके 7 राज्यांत तैनात आहेत, त्यातील 50 पथके एकट्या गुजरातमध्ये आहेत. हवामान विभागाने सांगितले की, या वादळाचा सर्वाधिक फटका गुजरातला बसेल. द्वारका, कच्छ, पोरबंदर, जुनागड, गिर सोमनाथ, अमरेली, राजकोट, मोरबी आणि जामनगर जिल्ह्यातील कच्चे घर पूर्णपणे उद्धवस्त होतील, तर पक्क्या घरांनाही काही प्रमाणात नुकसान पोहोचेल.त्यामुळे गुजरातच्या किनारपट्टी भागातील जवळपास 1.5 लाख लोकांना इतर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. पश्चिम किनारपट्टीवरुन हजारो घरे रिकामे करण्यात आले आहेत.

या व्यतिरिक्त पोरबंदर ते महुवा (भावनगर जिल्हा) दरम्यान आज रात्री साडेआठ ते अकराच्या दरम्यान या वादळाचा लँडफॉल होईल, असे हवामान खात्याने सांगितले आहे. यामुळे जुनागढ, भावनगर, गीर सोमवार, पोरबंदर आणि अमरेली जिल्ह्यातही याचा परिणाम जाणवेल. राज्यातील 21 जिल्ह्यातील 24 तहसील क्षेत्रात पाऊस सुरु आहे. काही गावांमध्ये 1-1 इंच पाऊस झाला आहे. या वादळाचा धोका राजस्थानपर्यंत आहे. वादळ दरम्यान हवेची गती 175 किलोमीटर प्रतितास जाऊ शकते. मात्र संपूर्ण गुजरातमध्ये वादळाचा परिणाम झाल्यामुळे दिवसभर मुसळधार ते जोरदार पाऊस पडेल. राजस्थानात पोहोचेपर्यंत, वादळ कमकुवत होऊन डीप डिप्रेशनमध्ये बदलेल. 18 मे रोजी दुपारपर्यंत कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये बदलत हिमालयाच्या दिशेने जाईल. भारतीय हवामान विज्ञान विभाग (IMD) चे डायरेक्टर जनरल (DG) मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले की, राज्यातील 17 जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: May 17, 2021, 8:57 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *