दुर्देवी ! हेलिकॉप्टरची ट्रायल घेताना पंखांनीच केला तरुणाचा घात
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील शेख इस्माईल ऊर्फ मुन्ना शेख इब्राहिम या तरुणाने घरीच एक हेलिकॉप्टर बनवलं. पण त्याची ट्रायल घेताना फॅन तुटून झालेल्या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. महागाव (Mahagaon) तालुक्यातील फुलसावंगी इथे ही धक्कादायक घटना घडली. शेख इस्माईल ऊर्फ मुन्ना शेख इब्राहिम (Shaikh Ibrahim ) असं या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे. तो अवघ्या 25 वर्षांचा होता.
इब्राहिम शेखने इतक्या लहान वयात चक्क हेलिकॉप्टर बनवलं होतंतयार केलेले हेलिकॉप्टर 15 ऑगस्टला हवेत उडविण्यासा शेख इस्माईल उर्फ मुन्ना शेख इब्राहिम सज्ज झाला होता. मात्र, तत्पूर्वी मंगळवारी (10 ऑगस्ट) रात्री दहा वाजणेच्या सुमारास सराव सुरु होता. त्यावेळी आजूबाजूला इब्राहिमचे मित्रही होते. इब्राहिमने हेलिकॉप्टर सुरु केलं. त्यावेळी हेलिकॉप्टरच्या पंख्यांनी वेग घेतला. हेलिकॉप्टर हवेत झेपावणार असं वाटत असतानाच घात झाला. हवेत झेपावलेल्या हेलिकॉप्टरचा पंखा हवेतच तुटला आणि तो हेलिकॉप्टरच्या मुख्य पंख्यावर येऊन आदळला. त्यानंतर मुख्य पंखा शेख इस्माईल उर्फ मुन्ना शेख इब्राहिम याच्या डोक्यावर आदळला. पंख्याचा फटका वर्मी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. कुणालाही काही कळण्यापूर्वीच या पंख्यांनी इब्राहिमवर मोठा आघात झाला आणि होत्याचं नव्हतं झालं. फॅन तुटून इब्राहिमच्या डोक्याला लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. इब्राहिमचा मृत्यू झाला. इब्राहिमच्या मृत्यूने एक कर्तबगार, प्रयोगशील तरुण हरपला. फुलसावंगीसह संपूर्ण महागाव तालुका या धक्कादायक घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.स्माईल हा एक पत्रा कारागिर होता. त्याने दोन वर्षे कठोर परिश्रम करुन स्वत:चे हेलिकॉप्टर तयार केले होते. लहानपनापासूनच तो पत्रा कारागिरीच्या व्यवसायात होता. त्यामुळे पत्र्यापासून विविध वस्तू बनविण्याचा त्याला सुरुवातीपासून सराव होता. या आधी त्याने अनेक प्रकारची कपाटं, कुलर अशा विविध वस्तू बनवल्या आहेत. एके दिवशी त्याला हेलिकॉप्टर बनविण्याची कल्पना सुचली आणि तो ध्यासाने पछाडला गेला. दोन वर्षे अथक परिश्रम केल्यानंतर त्याचे स्वप्न साकार झाले.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: August 11, 2021, 6:33 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY