देवेंद्र फडणवीस 2 दिवस कोकणात ,तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा घेणार आढावा
मुंबई : कोरोनाच्या दुसर्या लाटेचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रामध्ये 2 दिवसांपूर्वी तौक्ते चक्रीवादळामुळे Cyclone Tauktae) झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी आज (19 मे) विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांचा आज रायगड दौरा आहे. देवेंद्र फडणवीस 2 दिवसांच्या कोकण दौर्यावर आ हेत. ते कोकणात विविध भागा मध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत.
दरम्यान आज अलिबाग मध्ये रोह्यात नुकसानीची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकार्यांसोबत बैठक देखील करणार आहेत. आज रायगड आणि दुसर्या दिवशी ते रत्नागिरी जिल्ह्याला भेट देणार आहेत. मागील वर्षी ‘निसर्ग’ चक्रीवादळ आणि त्यापाठोपाठ यंदा त्याहून शक्तिशाली ‘तौक्ते चक्रीवादळाचा कोकणाला मोठा फटका बसला आहे. यामध्ये झालेल्या नुकसानीचा पुन्हा आढावा घेण्याचं काम सुरू आहे.
कोकणात चक्रीवादळानंतर अनेक गावामध्ये बत्ती गूल होती. तर वीजेचे खांब, झाडं कोलमडून पडल्याने अनेकांचे हाल झाले आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मीडीयाला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळ आल्यावर राज्य सरकारने जी मदत जाहीर केली, ती एकतर तोकडी होती आणि तीही मिळाली नाही. तौक्ते वादळानंतर नुकसानीचा अंदाज घेऊन राज्य सरकारने भक्कमपणे जनतेच्या पाठिशी उभे रहायला हवे. अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 19, 2021, 1:51 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY