वेळेत लसींचा पुरवठा न वाढल्यास लसीकरण ठप्प होईल, केंद्राकडून पुरवठा कमी प्रमाणात – आरोग्यमंत्री राजेश टोपे
अनेक जिल्ह्यात लस नाही म्हणून केंद्र बंद करावी लागत आहेत. या परिस्थिती कुणीच राजकारण करू नये
मुंबईः महाराष्ट्रात एका दिवसांत ५५,४६९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तसेच दिवसभरात २९७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. .सध्या राज्यातील मृत्यूदर १.८१% एवढा आहे. दरम्यान , आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी 14 लाख लसी उपलब्ध आहेत. हा तीन दिवसांचा स्टॉक आहे. तीन दिवसांनी लसीकरण (Vaccination) ठप्प होईल. दर आठवड्याला ४० लाख लसीचा पुरवठा केला पाहिजे. त्यामुळे तात्काळ केंद्र सरकारने लसीच्या डोसचा पुरवठा वाढवावा असे म्हटलं आहे. काल केंद्रीय आरोग्य मंत्रालायासोबत त्याबाबत चर्चा देखील झाल्याचं म्हटलं आहे.अनेक ठिकाणी लस नाही, अनेक जिल्ह्यात लस नाही म्हणून केंद्र बंद करावी लागत आहेत. या परिस्थिती कुणीच राजकारण करू नये असे आवाहन देखील त्यांनी केले.
केंद्राच्या अपेक्षा आम्ही पूर्ण केल्या आहेत. केंद्राकडून आम्हाला काही अपेक्षा आहेत.आम्ही ३ लाख दररोज लसीकरण करत होतं ते ६ लाख करा असं सांगितलं. आज आम्ही ४.५ लाखापर्यंत पोहचलो पण लस नाही म्हणून आम्हाला काही लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागले. लस नाही म्हणून अनेक केंद्रावरून लोकांना आम्ही परत पाठवत आहोत. लसीचा पुरवठा करा असं आम्ही केंद्राकडे वारंवार सांगतोय असे ते म्हणाले.
महाराष्ट्रात सध्या 45 वर्षांपर्यंतच्या नगारिकांना सरसकट लस दिली जात आहे. पण संक्रमण हे तरूणांमध्ये अधिक असल्याने लसीकरणासाठी किमान वय 25 वर्ष करण्याची देखील आग्रही मागणी केल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. यावेळेस त्यांनी केंद्रासोबत रेमडीसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजन पुरवठा यांची माहिती दिली आहे. इतर राज्यातून महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा असे देखील त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात रेमडीसिव्हीर लसींचा एक डोस कमाल 1100-1400 रूपयांमध्ये उपलब्ध होणार असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान राज्यात रेमडीसीवीर चा काळा बाजार करू नका. केंद्र सरकारच्या माहितीनुसार विशिष्ट गटातील रूग्णांवरच रेमडीसीव्हीर वापरा असे देखील आवाहन राजेश टोपेंनी राज्यातील खाजगी आणि सरकारी रूग़्णालयांना केले आहे. डॉक्टरांनी आपलं बिल वाढवण्याकरिता असं करू नका.रेमडिसिव्हरचा भाव ३ ते ४ हजार केला जातो. ते ११०० ते १४०० च्या वर विकू नये असं आपण ठरवलंपण त्याचं पालन केलं जात नसल्याचं दिसून आलं. यासाठी आम्ही एक समिती नेमली आहे ती रेमडेसेवीरची किंमत ठरवेल.त्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. नफेखोरीच्या भानगडीत पडू नका, फेअर नफा कमवा, अशी कळकळीची विनंती त्यांनी केली.मुंबई, पुणे मधील स्थिती पाहता तेथे बेड वाढवण्याचं काम सुरू असल्याचं सांगितलं आहे. यासोबतच महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येमाहे त्यांनी नवीन स्ट्रेन असल्याची माहिती दिली आहे. हा सट्रेन कमी वेळात अधिक लोकांना बाधित करत असल्याची माहिती दिली आहे. सध्या या स्ट्रेनचे सॅम्पल National Centre for Disease Control कडे पाठवले असल्याचेही सांगण्यात आले आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 7, 2021, 3:15 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY