जीवघेणे मॅनहोल, थोडक्यात महिला बचावली ! पाहा व्हिडिओ
मुंबई:. (Mumbai) शहरात मुसळधार पावसाने (Mumbai Rains) दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाणीच पाणी साचले आहे. रस्ता, फुटपाथ आणि रेल्वे ट्रॅकवरही पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत साचलेल्या पाण्यातून नागरिकांना मार्ग काढावा लागतो आहे. दरम्यान,भांडूप (पश्चिम) येथील व्हिलेज रस्त्यावर पूर्वेला असलेल्या एका मॅनहोलचे झाकण कालच्या जोरदार पावसामुळे निघाले होते.यातच मुंबईत रस्त्यांवर पाणी साचले असताना उघडे असलेले ड्रेनेजचे होलमुळे मरता मरता थोडक्यात वाचलेल्या महिलेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. महिला पडताना वाचल्याची चित्रफित समाजमाध्यमांमध्ये तसेच वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाली आहे. त्याची दखल घेत पालिकेने सदर मॅनहोल तातडीने हटवून तेथे नवीन मॅनहोल लावले आहे.
दरम्यान, पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईतल नालेसफाई आणि मॅनहोल बंद केल्याचे महापालिका अनेकदा सांगत असते. परंतू, दोन्ही दावे फोल ठरतात आणि मुंबईत पाणी साचते. अनेक मुंबईकर मॅनहोलमध्ये अडकतात. पडतात आणि जीवालाही मुकतात. त्यानंतर प्रसारमाध्यमं या घटनांची दखल घेते. बातम्या बनतात. राजकीय नेते प्रतिक्रिया देतात. प्रशासन काहीसे हालचाल करते. नंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे राहते. हा खेळ जीवघेणा ठरतो. अपघात होतात. अनेकांचे प्राण जातात. त्यामुळे मॅनहोल नेहमीच चर्चेचा विषय ठरता.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: June 10, 2021, 7:21 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY