Breaking News

ब्रेक द चेन मधील निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 16, 2021 4:18 pm
|

मुंबई – कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने ब्रेक द चेन मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबरोबरच नियम मोडणा-यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले.

ब्रेक द चेनच्या अंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. या निर्बंधांच्या अंमलबजावणीचा आढावा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज घेतला. या बैठकीस अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,अपर मुख्य सचिव(अपील व सुरक्षा)आनंद लिमये,प्रधान सचिव विनीत अग्रवाल,

मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, पोलिस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.राज्यात 144 कलम लागू करण्यात आले आहे. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणेच अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. हे सर्व निर्बंध कोरोनाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आलेले आहेत. नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी सर्वोतोपरी राज्य शासन घेते आहे, हा विश्वास जनतेच्या मनात पोलिस प्रशासनाने निर्माण करावा. तसेच अधिकारांचा वापर देखील संवेदनाशीलपणे करण्याचे निर्देश देतानाच कोणत्याही तक्रारी येणार नाही, यादृष्टीने चांगले नियोजन करण्याच्या सूचनाही गृहमंत्र्यांनी यावेळी दिल्या.कोरोनाच्या लढाईत पोलिस विभाग अहोरात्र कार्यरत आहे. पोलिसांनी मनोधैर्य खचू न देता कर्तव्य बजवावे, आम्ही आपल्या सोबत आहोत, असा विश्वास त्यांनी यावेळी पोलिस यंत्रणेला दिला.

त्रिसूत्रीचे पालन करा

जनतेने कोरोनाच्या या लढाईमध्ये शासनास तसेच पोलिस प्रशासनास सहकार्य करून कोरोनाच्या त्रिसूत्रीचे म्हणजे मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे यांचे पालन करावे, असे आवाहन श्री वळसे पाटील यांनी यावेळी केले.पोलिस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी राज्यात कलम 144 च्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजना व अंमलबजावणीची माहिती दिली. मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी ब्रेक द चेन च्या निर्बंधाबाबत माहिती दिली.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 16, 2021, 4:18 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *