राज्यातील पत्रकारांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करून लसीकरणात प्राधान्य द्या ; देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई : राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने थैमान घातला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील स्थिती गंभीर झाली असून रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून आरोग्य व्यवस्थेवर देखील मोठा ताण निर्माण झाला आहे. गेल्या वर्षभरात अनेक पत्रकारांना आपला जीव गमवावा लागला असून आता राज्यातील पत्रकारांचे तातडीने लसीकरण करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली असून त्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन पानी पत्रं लिहून पत्रकारांच्या समस्यांकडे लक्ष वेधलं आहे. तसेच देशभरात अनेक राज्यांनी पत्रकार आणि कॅमेरामनना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून घोषित करण्यात आल्याचे फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं आहे. इतर राज्यांच्या धर्तीवर आपणही पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स जाहीर केलं पाहिजे, असं त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान , सध्या सुमारे १२ राज्यांमध्ये प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून जाहीर करण्यात आले आहे. दुर्दैवाने, महाराष्ट्रात मात्र हा निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. राज्यातील अनेक ज्येष्ठ पत्रकार, पत्रकारांच्या विविध संघटना यासंदर्भात सातत्याने मागणी करीत आहेत. परवा तर राज्यातील पत्रकारांनी ऑनलाईन माध्यमांतून सांकेतिक आंदोलन सुद्धा केले. कोरोना साथीच्या पहिल्या लाटेत आपण अनेक पत्रकारांना मुकलो. या दुसर्या लाटेत सुद्धा या रोगाला बळी पडलेल्यांची संख्या मोठी आहे. अशात त्यांच्या सुरक्षेची, जिवितेची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांना फ्रंटलाईन वर्कर्स जाहीर केल्यास आपसुकच लसीकरणात त्यांना प्राधान्य मिळेल, असं फडणवीसांनी पत्रात नमूद केलं आहे.दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांनी आणि नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे हि मागणी अनेकदा केली आहे. तरी पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत सकारात्मक निर्णय घेत नाही आहेत. परवा राज्यातील पत्रकारांनी ऑनलाईन माध्यमांतून सांकेतिक आंदोलन सुद्धा केले आहे. पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर्स म्हणून घोषित करण्यास काय अडचण आहे ? पत्रकारांशी महाविकास आघाडीचे सरकार शत्रूसारखे का वागतेय ? मुख्यमंत्र्यांच्या मनात पत्रकारांबद्दल इतका रागा का आहे? अशा प्रकारचे अनेक प्रश्न सध्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेकजण मुख्यमंत्र्यांना विचारत आहेत.परवा झालेल्या पत्रकारांच्या ऑनलाईनसभेत मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. तसेच पत्रकारांना फ्रंटलाइन वर्कर मानून प्राधान्याने लसीकरणाचा निर्णय घेण्यासाठी यावेळी त्यांनी सरकारला अल्टीमेटम दिला आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला असल्याची माहिती सध्या मिळत आहे .
राज्यातील प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करून लसीकरणात त्यांना प्राधान्य देण्याबाबत मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांना पत्र.. pic.twitter.com/q7Peo26NP5
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 12, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 12, 2021, 4:12 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY