…तर त्या बारमालकांना अद्याप अटक का केले नाही?”: सचिन सावंत
मुंबई :महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती काल (16 जुलै) समोर आली होती. परंतु अंमलबजावणी संचालनालयाने देशमुखांच्या जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत ही तब्बल 350 कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. यानंतर ईडीने अनिल देशमुखांवर आत्तापर्यंत केलेली कारवाई आणि तपासात बाहेर आलेल्या गोष्टी यावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी 4 सवाल उपस्थित केले आहेत. आपल्या ट्विटर हँडलवरून सचिन सावंतांनी ईडीला सवाल केले आहे. तसेच मोदी सरकारवर आरोपही लावला आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने उत्तरे द्यावीत असे म्हणत सचिन सावंतांचे 4 सवाल
अजूनही ₹ 300 कोटींच्या मीडियातील वावड्यांची पुष्टी करता का? कारण आता आपल्या म्हणण्याप्रमाणे ही जमीन 2005 मध्ये खरेदी केली गेली आणि ₹ 2.67 कोटी किंमतीची आहे?
फ्लॅटची किंमत 2004 मध्ये दिली गेली तर तो या प्रकरणात कसा जोडला जाऊ शकतो?
तुम्ही जाहीर केले की डान्स बारच्या मालकांनी वाझे यांच्यामार्फत अनिल देशमुख यांना ₹ 4.70 कोटी दिले. ते बार मालक अद्याप गजाआड का नाहीत?
तथाकथित दरमहा 100 कोटी गोळा करण्याबाबत सचिन वाझेला दिलेल्या कथित आदेशाची तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना माहिती होती, तर त्याबाबत त्यांनी वेळीच कोणतीही कारवाई न केल्याबद्दल त्यांची चौकशी का होत नाही?
महाराष्ट्र के पूर्व गृहमंत्री @AnilDeshmukhNCP जी पर कार्रवाई करने वाले प्रवर्तक संचालनालय से हमारे चार सवाल।
राष्ट्रीय जांच एजेंसियों को महाराष्ट्र विकास आघाड़ी सरकार को बदनाम करने हेतु इस्तेमाल किया जा रहा है यह हमारा आरोप सही साबित हो रहा है। pic.twitter.com/0Vv0z03RdB— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 17, 2021
सचिन सावंतांनी ईडीला चार सवाल केले यासोबतच मोदी सरकावर गंभीर आरोपही केले आहेत. ईडीची ही कारवाई म्हणजे राज्यातील महाविकासआघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा दावाही सावंतांनी केला. सावंतींनी ट्विट केले की, ‘या सर्व कारवाया मोदी सरकारच्या आदेशाने आणि महाराष्ट्र विकास आघाडीला बदनाम करण्यासाठी राजकीयदृष्ट्या प्रेरित आहेत या आमच्या म्हणण्याला यातून बळ मिळत आहे.’
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: July 17, 2021, 7:49 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY