मुंबईकरांसाठी आला कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा इतका साठा, इथे पहा लिस्ट
मुंबई मध्ये आज पालिका, राज्य सरकार आणि खाजगी केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे (BMC) शासकीय (Government Centre) आणि खासगी लसीकरण केंद्रांवर (Private Vaccination Centre) ही लस पोचविण्यात येतेय. जसा लसींचा साठा वाढेल तशी उद्यापासून अधिक केंद्रं कार्यान्वित होतील अशी माहिती बीएमसीकडून देण्यात आली आहे.त्यामुळे आजपासून पुढचे तीन दिवस मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रांवर (Mumbai Vaccination Centre) लस उपलब्ध होणार आहे.
मिळालेल्या लसीमध्ये मुंबईला कोवाक्सिनचा साठा खूपच कमी आहे. म्हणूनच, ज्या काही केंद्रांमध्ये कोवॅक्सि दिले जातंय तिथे दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य दिले जातंय. कोविशिल्टचा साठा जास्त असल्याने लस देण्यास काहीच अडचण येणार नाही. मुंबई महानगरपालिका आणि सरकारच्या वतीने खासगी रुग्णालयात तब्बल 59 लसीकरण केंद्रे आणि 73 लसीकरण केंद्र सुरू आहेत. एकूण 132 लसीकरण केंद्र सध्या कार्यरत आहेत. पण कधी लसीचा पुरवठा कमी झाल्यामुळे हा साठा कमीअसल्याने काही लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण थांबवावे लागत आहे . यामुळे, दुसरा डोस घेतलेल्यांना प्राधान्य देण्याचे आणि साठा पाहून लसीकरणाच्या मोहिमेला वेग देण्याचे काम सुरू केले आहे.
दरम्यान , आज (२६ एप्रिल, २०२१) सुरू असणाऱ्या कोविड लसीकरण केंद्रांची ही यादी
सर्व महानगरपालिका/शासकीय लसीकरण केंद्रे सुरू आहेत. काही खासगी केंद्रं विलंबाने सुरू होणे अपेक्षित आहे. याव्यतिरिक्त, लससाठा मिळाल्यावर झाल्यावर इतर केंद्रं उद्यापर्यंत सुरू होणे अपेक्षित आहे.
आज (२६ एप्रिल, २०२१) सुरू असणाऱ्या कोविड लसीकरण केंद्रांची ही यादी
सर्व महानगरपालिका/शासकीय लसीकरण केंद्रे सुरू आहेत. काही खासगी केंद्रं विलंबाने सुरू होणे अपेक्षित आहे.
याव्यतिरिक्त, लससाठा मिळाल्यावर झाल्यावर इतर केंद्रं उद्यापर्यंत सुरू होणे अपेक्षित आहे pic.twitter.com/2TwfyQZXGG
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 26, 2021
अंधेरी (पूर्व) स्थित सेव्हन हिल्स रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्रात लससाठा उपलब्ध होवून हे केंद्र पुन्हा सुरू झाले आहे. कोविशील्ड व कोव्हॅक्सीन ह्या दोन्ही लसी येथे उपलब्ध आहेत. मात्र, कोव्हॅक्सीन केवळ दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना देण्यात येत आहे.
सांताक्रूझ (प) स्थित सुर्या रुग्णालय व अंधेरी (पू) स्थित होली स्पिरिट रुग्णालयातील लसीकरण केंद्रं आज दुसऱ्या सत्रात सुरू होणार आहेत.
दोन्ही लसीकरण केंद्रांमध्ये कोविशील्ड ही लस देण्यात येणार आहे.#MyBMCUpdates https://t.co/Jr0c2cduk4
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 26, 2021
सांताक्रूझ (प) स्थित सुर्या रुग्णालय व अंधेरी (पू) स्थित होली स्पिरिट रुग्णालयातील लसीकरण केंद्रं आज दुसऱ्या सत्रात सुरू होणार आहेत. दोन्ही लसीकरण केंद्रांमध्ये कोविशील्ड ही लस देण्यात येणार आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 26, 2021, 1:47 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY