जिल्हाधिकाऱ्याची दबंगगिरी: अगोदर तरुणाचा मोबाईल फोडला नंतर थोबाडीत मारली
छत्तीसगड : लॉकडाऊनचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी शनिवारी पोलिसांसोबत शहरात फिरत असतां त्यांना रस्त्यात एक तरुण दिसला. जिल्हाधिकाऱ्याने त्या तरुणाला बाहेर फिरण्याचे कारण विचारले असता त्या तरुणाचे उत्तर जिल्हाधिकाऱ्यांना पसंत न पडल्याने त्यांनी त्या तरुणाचा मोबाईल रस्त्यावर आपटून फोडला नंतर त्याच्या थोबाडीत मारली आणि इतक्यावरच न थांबता पोलिसांनाही त्या तरुणास मारण्यास सांगितले.जिल्हाधिकाऱ्याच्या दादागीरीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. रणबीर शर्मा असे असून त्यांचे नाव असून छत्तीसगड राज्यातील सूरजपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत.
व्हिडिओत दिसत आहे की, कलेक्टर पोलिसांना म्हणतात- तो व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावर पोलिसांनी त्या तरुणाला चांगलाच चोप दिला. यावेळी तो तरुण गयावया करत म्हणतो- देवा शपत सांगतोय, ही पावती पाहा. मी कोरोना चाचणी करण्यासाठी बाहेर आलो होतो. मी तुमची रेकॉर्डिंग केलीच नाही. यानंतर त्याच्यावर एफआयआर दाखल करा, असे म्हणून कलेक्टर तेथून निघून जातात.
घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत अनेकांनी जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या या कृत्याला चुकीचे म्हटले. तर भाजप नेत्या रेणुका सिंग यांनी कारवाई ची मागणी केली आहे. त्या म्हणाल्या अमानवीय यवहार करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यां विरुद्ध मुख्यमंत्री भूपेश बघेल FIR दाखल करतील का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान ,जिल्हाधिकारी शर्मा यांनी त्या व्हिडिओला एडीटेट म्हटले आहे. ते म्हणाले की, फक्त मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. पण, त्यापूर्वी तो तरुण उलट सुलट उत्तर देऊ लागला. असे त्यांनी म्हटले आहे.
टूलकिट मामले में फर्जी रूप से पूर्व मुख्यमंत्री @drramansingh जी के ऊपर फर्जी FIR कराने वाले मुख्यमंत्री @bhupeshbaghel क्या सूरजपुर जिले के अमानवीय हरकत करने वाले कलेक्टर पर एफ आई आर दर्ज कराएंगे ?@BJP4India @BJP4CGState pic.twitter.com/E42JfyPrhV
— Renuukaa Sinngh (@renukasinghbjp) May 23, 2021
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 23, 2021, 2:58 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY