Corona Vaccine : ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी घेतली कोरोनाची लस
रायगड : ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी अलिबाग तालुक्यातील रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बुधवारी सायंकाळी पाच वाजता कोरोनाची लस घेतली. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी वयाच्या 75 व्या वर्षी लस घेतली. रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नर्स आश्विनी नाईक यांनी डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना लस टोचली. यावेळी डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आवाहन केले कोरोनाची लस सुरक्षित आहे. अखंड समाजाच्या सुरक्षेसाठी सदरची लस महत्वाची असल्याने सरकारच्या सुचनेनुसार सर्वांनी लस घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे . लस घेतल्यानंतरही नाका-तोंडाला मास्क लावा, सातत्याने हात स्वच्छ धुवा आणि सामाजिक अंतराचे भान ठेवा. सरकार आणि प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करा, असेही आवाहन त्यांनी केले.
तसेच,डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे चिरंजीव उमेशदादा धर्माधिकारी यांनी देखील लस घेतली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत घासे, डॉ. जुईली म्हात्रे, नर्स निशा कावजी यांच्यासह अन्य आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. सर्वत्रच कोरोनाचा प्रकोप सातत्याने वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासन प्रयत्न करत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन्ही लसींची भारतात निर्मिती करण्यात आली आहे. देशातील नागरिकांना लस देण्याचा कार्यक्रम सर्वत्र सुरु आहे.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: April 8, 2021, 2:18 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY