Breaking News

तुमच्यावर खुनाचा खटला चालला पाहिजे, कोरोनाची दुसरी लाट तुमच्यामुळे आली; मद्रास हायकोर्टाने फटकारले

आजच्या परिस्थितीत जिवंत राहणे आणि लोकांना जिवंत ठेवणे महत्वाचे आहे, बाकी इतर सर्व गोष्टी या नंतर येतात.

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 26, 2021 8:24 pm
|

चेन्नई : कोरोना महामारीच्या सध्याच्या परिस्थितीला मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला जबाबदार धरत चांगलेच फटकारले आहे. निवडणुकीच्या सभांमध्ये राजकीय पक्षांच्या वतीने कोरोना प्रोटोकॉलला तिलांजली देण्यात आल्याबद्दल मद्रास हायकोर्टाने निवडणूक आयोगाची कानउघाडणी केली.दरम्यान,उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सनिब बॅनर्जी म्हणाले की, कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाला निवडणूक आयोग जबाबदार असून त्यांच्यावर खुनाचा खटला चालवला पाहिजे. पुढे बोलताना ते म्हणाले की, सद्य:परिस्थितीला केवळ आणि केवळ निवडणूक आयोगच जबाबदार असल्याचे हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश कडक शब्दांत म्हणाले. मतदानाच्या दिवशी म्हणजेच 2 मे रोजी कोविड प्रोटोकॉलची खबरदारी घ्यावी, असेही मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला निर्देश दिले आहेत. असे केले नाही तर मतमोजणीवर त्वरित बंदी घातली जाईल, असे कोर्टाने म्हटले आहे.मद्रास उच्च न्यायालय हे करुर विधानसभा मतदारसंघातील मतमोजनीच्या संबंधित याचिकेवर सुनावणी करीत होते.

सभा, रॅली होत असताना तुम्ही दुसर्‍या ग्रहावर होतात का?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या संकटाबाबत मद्रास हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान हायकोर्टाने निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले संबंधित याचिकेतील सुनावणीदरम्यान, सरन्यायाधीश सनिब बॅनर्जी संतापले. त्यांनी आयोगाला प्रश्न करत विचारले की, जेव्हा निवडणुकीच्या सभा, रॅली होत होत्या, तेव्हां तुम्ही काय दुसर्‍या ग्रहावर गेला होतात की काय? निवडणुकीत होणार्‍या रॅलीमध्ये कोविड प्रोटोकॉल तोडत असताना तुम्ही का रोखले नाही. ते पुढे म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीला तुमचा निवडणूक आयोग जबाबदार असून संबंधित अधिकार्‍यांवर खुनाचा खटला चालवला पाहिजे. या याचिकेवरील पुढील सुनावणी 30 एप्रिल रोजी होणार आहे.

मतमोजणीसंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या 6 प्रतिक्रिया

1. कोविड प्रोटोकॉल मतमोजणीच्या दिवशी लागू झाला आहे याची खात्री करा.

2. मतमोजणीचा दिवस कोणत्याही किंमतीवर राजकीय किंवा गैर-राजकीय कारणांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये.

3. एकतर ही मतमोजणी पद्धतीने असेल किंवा ती पुढे ढकलले जाईल.

4. लोकांचे आरोग्य सर्वात महत्वाचे आहे. प्रशासनाला याची आठवण करून द्यावी लागते हे किती दुर्दैव.

5. जेव्हा नागरिक जिवंत राहतील, तेव्हाच त्यांना या लोकशाहीमध्ये मिळलेल्या हक्काचं उपयोग करु शकतील.

6. आजच्या परिस्थितीत जिवंत राहणे आणि लोकांना जिवंत ठेवणे महत्वाचे आहे, बाकी इतर सर्व गोष्टी या नंतर येतात.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 26, 2021, 8:24 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *