धक्कादायक : कोरोना RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
उल्हासनगर: कोरोनाच्या चाचणीसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक उल्हासनगरमधील छोटछोट्या घरांमध्ये जमिनीवर सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता पॅकिंग केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्वॅग स्टिक पॅकिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी कोरोनाची अँटिजन किंवा RTPCR टेस्ट केली जाते. यासाठी टेस्ट वापरल्या जाणा्ऱ्या टेस्ट कीटमध्ये एक स्वॅब स्टिक असते. कोरोना तपासणीसाठी जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणित केलेले कीटच वापरले जातात. टेस्टिंगसाठी लागणारा स्वॅब रुग्णाच्या स्वॅबमधून स्टिक द्वारे काढला जातो. या स्वॅब स्टिक घराघरातच पॅकिंग केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमधील ज्ञानेश्वरनगरमध्ये उघडकीस आला आहे.
दरम्यान काही महिलांसह लहान मुलं देखील ही पॅकिंग करत होते. स्वॅब किट पॅकिंग करताना ना कुणी मास्क घातलं होत किंवा कोणत्याही प्रकारची सुरक्षिततेची काळजी घेतली जात नसल्याचं समोर आलं आहे . परिसरातील 10 ते 15 घरात या स्टिकची पॅकिंग केली जात होती. दिवसाला एका घरात पाच हजार स्टिक पॅकिंग केली जात होते. या नागरिकाना हे स्टिक पॅकिंगसाठी कुणी दिले त्याचा शोध पोलीस करत आहेत. तर याबाबत एफडीएला अहवाल देणार असून त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं उल्हासनगर महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणरे किट कितपत सुरक्षित आहेत, असं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दुपारच्या सुमारास उल्हासनगर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त,उपायुक्त, वैद्यकीय अधिकारी तसेच उल्हासनगर पोलिसांनी ज्ञानेश्वरनगरमधील घरांमध्ये धाड टाकली. यावेळी घराघरात जाऊन तपासणी करत काही घरातून स्वॅब स्टिकचा साठा ताब्यात घेण्यात आला.पालिका या संपूर्ण प्रकाराचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.
Published: May 5, 2021, 10:45 pm- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
राज्यभरातील क्षणाक्षणांच्या महत्वाच्या Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.
LEAVE A REPLY