Breaking News

धक्कादायक : मुंबई पाठोपाठ ठाण्यातही बोगस लसीकरण

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: June 29, 2021 5:54 pm
|

ठाणे : मुंबई पाठोपाठ ठाण्यातही बोगस लसीकरण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीने 116 जणांना बोगस लस टोचून 1 लाख 16 हजार रुपयांची फसवणूक केली असल्याचं समोर आले आहे. त्यातील चार जणांना बनावट प्रमाणपत्रही देण्यात आली आहेत.

मुंबईत बोगस लसीकरणाचं प्रकरण समोर आल्यानंतर यामध्ये अटकेत असलेल्या आरोपींनी ठाण्यातही हा कारनामा केल्याचं चौकशीत समोर आलं होतं. याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता आरोपी महेंद्र सिंग आणि त्याचे सहकारी श्रीकांत माने, संजय गुप्ता, सिमा अहुजा व करीम यांच्या टोळीने 26 मेला नितीन कंपनी जवळच्या श्री जी आर्केडमधील रेन्यूबाय या कंपनीसाठी लसीकरण केल्याची माहिती समोर आली. कंपनीचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित या शिबिरात आरोपींनी बोगस डोस दिले. त्यासाठी प्रत्येक लसीमागे एक हजार रुपये या प्रमाणे ११६ जणांच्या लसीकरणासाठी एक लाख १६ हजार रुपये वसुल केले.

विशेष म्हणजे त्यातील चार जणांना बनावट प्रमाणपत्रही देण्यात आलं. मुंबई पोलिसांनी बनावट लसीकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर फसवणूक झालेल्या रेन्युबाय डॉट कॉम या कंपनीचे क्लस्टर सेल्स मॅनेजर उर्णव दत्ता यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले असून सध्या हे सर्व आरोपी मुंबईत अटकेत असल्याची माहिती नौपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक अनिल मांगले यांनी दिली.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: June 29, 2021, 5:54 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *