Breaking News

गजा मारणे यांच्या मिरवणूकत सामील झालेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही अटक

By: कालतरंग न्यूज वेब टीम | Updated: April 9, 2021 6:14 pm
|

पुणे : तळोजा कारागृहापासून कुख्यात गुंड गजा मारणे याची 15 फेब्रुवारी रोजी तळोजा कारागृहातून सुटका झाली. त्यावेळी त्याने 300 अलिशान वाहनांच्या ताफ्यासह तळोजा कारागृह ते पुणे अशी मिरवणूक काढली. याप्रकरणी तळेगाव आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात दरोडा आणि रॅली काढल्या प्रकरणी तीन गुन्हे दाखल झाले आहेत.या रॅली प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत 59 जणांना अटक केली आहे. तर रॅलीमध्ये सहभागी झालेली 23 अलिशान वाहने जप्त केली आहेत.

रॅलीसाठी पुणे, सातारा, नवी मुंबई आणि पिंपरी चिंचवड शहरातील सात वाहने सहभागी झाल्याची माहिती समोर आली आहे.पोलिसांनी आत्तापर्यंत अटक केलेल्या आरोपींमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव नगर परिषदेचा माजी नगराध्यक्ष संजय पिसाळ आणि शिवसेनेच्या एका तालुका अध्यक्षाचाही समावेश आहे. यामुळे गजा मारणे याचे राजकीय कनेक्‍शनही उघड झाले आहे.गजा मारणे याला सातारा जिल्ह्यातून अटक केल्याचे सांगितले जात आहे. मात्र तो पोलिसांना शरण आला असल्याचे बोलले जाते. त्याला शरण आणून देण्यात सातारा जिल्ह्यातील भाजप आणि राष्ट्रवादीचा एक नेता आणि पुणे शहरातील भाजपच्या एका नेत्याने महत्वपूर्ण भूमिका बजावल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.


बातम्यांच्या संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करा.

Published: April 9, 2021, 6:14 pm
राज्यभरातील  क्षणाक्षणांच्या महत्वाच्या  Updates , आणि आपल्या परीसरातील आपणास हवी असलेली बातमी सहजरित्या "कालतरंग न्यूज" मराठी लाईव्ह Whatsapp Group वर पाहण्यासाठी Link वर क्लिक करून Join करा सोबतच Website - ● www.kaaltarangnews.in , ● Facebook ● instagram; ● Twitter फॉलो करा व ● Youtube channel सबस्क्राईब करा, अपडेट राहा . तसेच आपल्या परिसरातल्या समस्या आम्हाला kaaltarangnews@gmail.com .पाठवा.

LEAVE A REPLY

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *